Shreya Maskar
नाशिकमध्ये निसर्गरम्य धरणे, धबधबे, हिरवीगार उद्याने आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत. वीकेंडला कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत एक दिवसाची सहल काढायची असेल तर ही ५ ठिकाणे नक्की भेट देण्यासारखी आहेत.
नाशिक शहराजवळ असलेले गंगापूर धरण निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. धरणाचा विस्तीर्ण जलाशय, आजूबाजूच्या टेकड्या आणि सुंदर सूर्यास्ताचा आनंद येथे घेता येतो.
सोमेश्वर धबधबा हा नाशिकमधील लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य अधिक खुलते. कुटुंबासोबत छोट्या सहलीसाठी हे ठिकाण उत्तम आहे.
त्र्यंबकेश्वरजवळ असलेला दुगारवाडी धबधबा घनदाट जंगल आणि हिरव्यागार निसर्गासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथे सुंदर धबधब्याचा आनंद घेता येतो.
पांडवलेणी हे ऐतिहासिक बौद्ध लेण्यांचे ठिकाण आहे. येथे प्राचीन कोरीवकाम पाहण्यासोबतच डोंगरावरून नाशिक शहराचे सुंदर दृश्य अनुभवता येते.
इगतपुरी परिसरातील भावली धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण ठरतो. डोंगररांगा, हिरवळ आणि धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
मुंबई, पुणे, नाशिकमधील पर्यटकांनी आवर्जून थंडीत या पिकनिक स्पॉट्सना भेट द्या. फोटोशूटचा भन्नाट आनंद लुटा. येथे तुम्ही मित्रमंडळी आणि फॅमिलीसोबत जाऊ शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.