Mumbai Bus Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बेस्ट बसने चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

Mumbai Bus Accident: मुंबईच्या मानखुर्दमध्ये बेस्ट बसला भीषण अपघात झाला. भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट डिव्हायडरवर धडकली.

Priya More
  • मानखुर्दमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात

  • सायन -पनवेल महामार्गावर घडली घटना

  • या अपघातामध्ये पादचाऱ्याचा मृत्यू झाला

  • या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले

मयूर राणे, मुंबई

मुंबईमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव बेस्ट बसने पादचाऱ्याला चिरडलं. बसच्या चाकाखाली चिरडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये बस चालक आणि वाहक दोघेही गंभीर जखमी झाले. ही अपघाताची घटना सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्दजवळ घडली. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्दमध्ये बेस्ट बसला भीषण अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दुभाजकाला धडकली. या अपघातावेळी बसने एका पादचाऱ्याला धडक दिली. चाकाखाली चिरडून या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील काही प्रवाशांनाही दुखापत झाली. तर बसचा चालक आणि वाहक हे गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी सांगितले की, अपघाताची ही घटना सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्दच्या विश्वकर्मा हॉस्पिटलजवळ घडली. सकाळी ९ वाजून १४ मिनिटांनी हा अपघात झाला. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये ३ जण जखमी झालेत. एकाचा मृत्यू झाला. जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये भास्कर पांडे (६५ वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर वसचा वाहक वैभव वाघमारे (४१ वर्षे) आणि चालक बनवरी श्रीराम प्रसाद शर्मा (५१ वर्षे) हे दोघे जखमी झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Earthquake: मध्यरात्री पालघर भूकंपाने हादरले! तासाभरात भूकंपाचे दोन धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Bhimashankar Temple: श्रावणात भाविकांना मोठा दिलासा; पाच महिन्यांनंतर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पूर्णवेळ खुलं

Maharashtra News Live Update: पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज तिरंगा रॅलीचे आयोजन

आरोग्य विभागात तब्बल 89 लाखांचा घोळ, अधिकाऱ्याच तडकाफडकी निलंबन

Colombia earthquake: 7.4 तीव्रतेच्या भूकंपाने कोलंबिया हादरलं; 111 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT