Mira Bhayandar news  
मुंबई/पुणे

Mumbai : थरकाप उडवणारा अपघात! मुंबईत धावत्या दुचाकीवर अचानक कोसळलं नारळाचे झाड; ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Mira Bhayandar news : मीरा-भाईंदरमधील राई गावात मुसळधार पावसादरम्यान धावत्या दुचाकीवर नारळाचे झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या ३५ वर्षीय राहुल पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

Coconut tree falls on moving motorcycle in Mumbai : मिरा-भाईंदरमधील राई गावात दोन दिवसांपूर्वी धावत्या दुचाकीवर नारळाचे झाड कोसळून झालेल्या भीषण अपघातातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३५ वर्षीय राहुल अशोक पाटील या दुचाकीस्वाराचा आज उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

मुसळधार पावसात राहुल रस्त्यावरून जात असताना अचानक हा भीषण अपघात घडला होता. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी अत्यंत तत्परता दाखवत त्याला तातडीने आयसीयूमध्ये (ICU) दाखल केले होते, मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्याचे प्राण वाचवण्यात अपयश आले. दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या राहुलची प्राणज्योत अखेर मालवली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत झाडाखाली अडकलेल्या राहुल यांना बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) उपचारासाठी ठेवण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून डॉक्टरांकडून त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू होते. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेमुळे राई गावासह संपूर्ण मिरा-भाईंदर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुसळधार पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धोकादायक व जीर्ण झालेल्या झाडांची वेळेत छाटणी व पाहणी करून अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या १३ जणांची सुखरूप सुटका

Farmer Loan Waiver Scheme: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ

Viral News : ज्या बॉसला किडनी दिली त्यानेच महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढलं

Diabetes Care in Monsoon: पावसाळ्यात ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची आहे? मग, या ७ गोष्टींची नक्की घ्या काळजी

भारताचा विद्यार्थी एकटा नाही! राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार गांधी स्मृतिस्थळी

SCROLL FOR NEXT