Mumbai Crime Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरट्या बाप बेटाच्या जोडीला अटक

Mumbai Crime News : मुंबईच्या आरे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरट्या बाप बेटाच्या जोडीला अटक केली .

Saam Tv

मुंबईतील आरे कॉलनीतील रॉयल पाम्स बंगल्यात झालेल्या घरफोडीचा गुन्हा

आरोपी बाप-बेटे नियामतुल्ला खान आणि शाहीद खान यांना अटक

पोलिसांनी ₹४७.६५ लाखांच्या सोन्या–चांदीच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तू हस्तगत

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या पथकाचं कौतुक

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील आरे कॉलनीतील रॉयल पाम्स इस्टेटमधील एका बंगल्यात झालेल्या घरफोडीचा गुन्हा केवळ १२ तासांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणात आरे पोलिसांनी सऱ्हाईत पिता–पुत्र चोरट्यांना अटक केली आहे.पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तब्बल ४७,६५,००० किंमतीची चोरीस गेलेली सोन्या–चांदीची दागदागिने आणि पितळी मूर्तींसह इतर मौल्यवान वस्तू हस्तगत केल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गंगाराजम गंगाराम वुटनुरी (वय ५९) यांनी बंगल्याची काच फोडून झालेल्या घरफोडीबाबत तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलद तपास सुरू करण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन पांचाळ यांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील ३५ सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या १२ तासांत संशयित पिता–पुत्र नियामतुल्ला आयुब खान उर्फ जुली (३८) आणि शाहीद नियामतुल्ला खान (१९) यांना अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश अंधारे, पो.ह.क. नागरे (९७११३५), पो.ह.क. गणेश पाटील, पो.ना.क. महाले आणि पो.शि.क. बरकडे यांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी —शशिकुमार मीना (अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग), महेश चिमटे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१२), आणि विजय भिसे (सहाय्यक पोलीस आयुक्त, दिंडोशी विभाग) — पथकाचे कौतुक केले आहे.

धमकीचा व्हिडिओ व्हायरल, मुलुंडमध्ये दहशत

सोशल मीडियावर सध्या मुलुंडचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये बलबीर सिंग लांबा उर्फ गिन्नी हा व्यक्ती “मी पाच वेळा तडीपार झालो, माझ्यावर कलम 307 ची केस आहे, तरी मी इथेच आहे, असे खुलेआम म्हणत आहे. या धमकीच्या व्हिडिओमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT