ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेव्हा एखादी गोष्ट आपल्या डोळ्यात जाते किंवा त्रास देते तेव्हा आपण सहजतेने डोळे चोळतो. वैद्यकीयदृष्ट्या, हे तुमच्या डोळ्यांसाठी अत्यंत धोकादायक असू शकते.
वारंवार डोळे चोळण्यामुळे आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या.
जेव्हा आपण वारंवार डोळे चोळतो तेव्हा आपल्या हातांवरील धूळ, बॅक्टेरिया आणि विषाणू थेट आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचू शकतात. यामुळे डोळ्यांना इन्फेक्शन होऊ शकतो.
डोळे चोळण्याची सवय असेल तर आजच थांबा. डोळे चोळण्याचा थेट परिणाम कॉर्नियावर होतो आणि त्यामुळे दृष्टी अंधुक होऊ शकते.
जर तुम्हाला आधीच अॅलर्जी असेल आणि त्यानंतरही तुम्ही वारंवार डोळे चोळत असाल तर तुमच्या डोळ्यांत जळजळ होऊ शकते आणि डोळे लाल होऊ शकतात.
वारंवार डोळे चोळल्याने डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांना नुकसान होण्याचा धोका असतो, ज्यामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल्स आणि सूज येऊ शकते.
डोळ्यांमध्ये धूळ गेल्यास किंवा डोळे खाजत असतील तर ते थंड पाण्याने धुवा. तसेच वारंवार डोळे चोळणे टाळावे.