ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात मिठाला विशेष महत्त्व आहे. साधे दिसणारे मीठ देखील तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकते
आज आम्ही तुम्हाला काही मिठाच्या उपायांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे भाग्य उजळू शकते.
जर तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकवायची आणि नकारात्मक ऊर्जा दूर करायची असेल तर त्यासाठी पाण्यात मीठ घालून फरशी पुसून टाका.
तुमच्या घराच्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात एक ग्लास मीठ पाणी ठेवल्याने कर्जमुक्ती तसेत आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.
असे मानले जाते की, आजारी व्यक्तीच्या पलंगावर काचेच्या भांड्यात मूठभर मीठ ठेवल्याने ती व्यक्ती काही दिवसात बरी होते.
जर तुमच्या घरात दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत असेल, तर बाथरूममध्ये समुद्री मीठाने भरलेला काचेचा भांडा ठेवावा यामुळे घरात शांती राहील.
जर कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर वारंवार वाईट नजर लागत असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीवर तीन वेळा मीठ उतरवून बाहेर फेकून द्या.