Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Chandrashekhar Bawankule News : तुमचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप गृप सर्व्हेलन्सवर आहेत.... असं धक्कादायक वक्तव्य सत्ताधारी मंत्र्याने केलंय... त्यावरुन पेगॅसिस प्रमाणेच नवं महाभारत रंगलंय... संजय राऊतांनीही बावनकुळेंना घेरलंय... नेमकं मोबाईल सर्व्हेलन्सचा वाद सरकारच्या कसा अंगलट येऊ शकतो? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट..
chanrashekhar bawankule News
chandrashekar bawankule Saam tv
Published On

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्सवर असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलंय.. आणि याच वक्तव्यावरुन राजकीय आखाडा रंगलाय..चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाणांसह मुंबईतील बिल्डर खासगी वॉर रुमच्या माध्यमातून शिंदेसेना आणि भाजपच्या नेत्यांवरही पाळत ठेवत असल्याचा आरोप करत राऊतांनी बावनकुळेंच्या अटकेची मागणी केलीय...

चंद्रशेखर बावनकुळे आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.. याच बैठकीत बावनकुळेंनी सगळ्यांवरच सर्व्हिलन्स ठेवला जात असल्याचं वक्तव्य केलं.. मात्र या वक्तव्यावरुन वाद पेटल्यानंतर आता बावनकुळेंनी सारवासारव केलीय.. तर आपण पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सर्व्हिलन्स ठेवत असल्याची कबुलीही बावनकुळेंनी दिलीय...

chanrashekhar bawankule News
Shocking : मुंबईत रक्तरंजित थरार! हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर बॉयफ्रेंडनेही आयुष्य संपवलं

खरंतर 2020 मध्ये तत्कालिन पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्लांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला.. मात्र राज्यात फोन आणि व्हॉट्सअपवर सर्व्हिलन्स ठेवणं कायदेशीर आहे का? पाहूयात...

chanrashekhar bawankule News
Satara News : डॉक्टर महिला बीडची असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारी डावलल्या? माजी मंत्री धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

फोन टॅपिंग आणि सर्व्हिलन्समुळे गोपनियतेच्या अधिकाराचं उल्लंघन होतं.. त्यामुळे भारतात फोन आणि व्हॉट्सअप सर्व्हिलन्स बेकायदेशीर आहे. त्यासंदर्भात भारतीय टेलिग्राफ कायदा आणि आयटी कायद्याच्या कलम 5(2) मध्ये सर्व्हिलन्सचा उल्लेख करण्यात आलाय.. मात्र सार्वजनिक सुरक्षेच्या कारणासाठी काही परवानग्या घेऊन फोन टॅपिंगला परवानगी देण्यात येते.

chanrashekhar bawankule News
जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणी अपडेट, केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या अडचणी वाढणार? चेंडू थेट पंतप्रधानांच्या कोर्टात

खरंतर देशभरातील विरोधी पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि न्यायमुर्तींवर पेगॅससच्या माध्यमातून पाळत ठेवल्या प्रकरणी राहुल गांधींनी रान पेटवलं होतं.. आता सर्व्हिलन्स ठेवणं बेकायदेशीर असतानाही खुद्द भाजपच्या मंत्र्यानेच सर्व्हिलन्स केलं जात असल्याचं वक्तव्य केल्यानं हा पाळत ठेवण्याचा दुसरा अंक सुरु झालाय का? याचीच चर्चा रंगलीय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com