Raj Uddhav Thackeray Alliance Saam Tv News
मुंबई/पुणे

आवाज मराठीचा, दोन ठाकरेंच्या एकीचा, सरकार विरोधात ठाकरेंनी आवळली वज्रमूठ; मेळाव्यात होणार युतीची घोषणा?

Raj Uddhav Thackeray Alliance : १९ वर्षांनी एकाच व्यासपीठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार आहे. कारण ठाकरेंनी एकीची वज्रमूठ आवळलीय. तर त्याची संयुक्त निमंत्रण पत्रिकाच राऊतांनी जारी केलीय. मात्र, या निमंत्रण पत्रिकेत काय म्हटलंय?

Bharat Mohalkar

भरत मोहोळकर, साम टिव्ही

मुंबई : सरकारने हिंदीसक्तीवरुन माघार घेतल्यानंतर ठाकरे बंधूंनी ५ जुलैला एकीची वज्रमूठ आवळण्याचं जाहीर केलंय. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी निमंत्रण पत्रिकाच प्रसिद्ध केलीय.

आवाज मराठीचा असं म्हणत ही जल्लोषाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका संजय राऊतांनी प्रसिध्द केलीय. ५ जुलैला वरळी डोममध्ये तब्बल १९ वर्षानंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मात्र राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र आल्यास मनसेचं अस्तित्व धोक्यात येईल, असा दावा शिंदे गटाने केलाय. तर भाजपने मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.

खरंतर हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची भूमिका घेतली. त्यानंतर सरकारने हिंदीसक्तीचे दोन्हीही जीआर रद्द केलेत. त्यामुळे आता ठाकरे बंधूंनी आवळलेली एकीची वज्रमूठ ५ जुलैच्या जल्लोष सभेनंतरही महापालिका निवडणुकीसाठी कायम राहणार की पुन्हा महापालिकेचं गणित जुळवून दोघांच्या वाटा वेगळ्या होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 तास ठाण्यातच ठेवले; 73 वर्षीय नागरिकाला ठाण्यातच ब्रेन स्ट्रोक, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीडमध्ये दाखल

Skin Care : शरीरावरील स्ट्रेच मार्क 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत, वेळीच घ्या जाणून

Nepal : ६ हून अधिक शहरांमध्ये कर्फ्यू; नेपाळमध्ये हिंसाचार उफाळला, दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना

LPG सिलेंडर ते रेल्वे तिकीट; १ ऑगस्टपासून देशभरात होतील ५ मोठे बदल

SCROLL FOR NEXT