
लाखो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि 'जय हरी विठ्ठल'च्या जयघोषात श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत आहेत. पंढरीच्या वारीला जाण्याची परंपरा ८०० वर्षांपासून सुरू आहे. हा वारी सोहळा यंदा ६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीला संपन्न होणार आहे. हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांसाठी सरकारने आनंदाची बातमी दिलीय.
सरकारकडून वारकऱ्यांसाठी वारकरी योजना-2025 राबवण्यात येत आहे. यात वारकऱ्याला आर्थिक साहाय्य दिलं जाणार आहे. वारीदरम्यान कुठल्याही कारणाने वारकऱ्याचा मृत्यू झाला तर सरकारकडून त्याच्या कुटु्बियांना ४ लाखाची मदत दिली जाणार आहे. या योजनेबाबत सरकारकडून नवे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. वारीदरम्यान कुठलाही अपघात झाला आणि वारकऱ्याला ६० टक्के होऊन अधिक अपंगत्व आले तर त्याला सरकारकडून ७४ हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.
वारकऱ्यांना सोयी-सुविधा आणि कल्याणकारी योजना राबवण्यात यावी यासाठी "मुख्यमंत्री वारकरी महामंडळ" स्थापन करण्यात आले आहे. या महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे आहे. पालखी मार्गांवर भूसंपादन, कायमस्वरूपी निधी आणि वारकऱ्यांसाठी निवारा, अन्न, सुरक्षा, वैद्यकीय मदत आणि विमा संरक्षण यासारख्या सुविधा पुरवण्याचे नियोजन या मंडळाकडून करण्यात येते.
यंदा ११०९ दिंड्यांना प्रत्येकी २०,००० रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनांनुसार सामाजिक न्याय विभागामार्फत एकूण २.२१ कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी जाहीर करण्यात आलीय. वारकऱ्यांच्या सोयीसाठी 80 विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.