Maharashtra Politics : ठाकरेंच्या युतीला मविआतून विरोध? राज ठाकरेंची भूमिका काँग्रेसला अमान्य?

Maharashtra Political News : ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडीलाच तडे जाण्याची शक्यता निर्माण झालीय. त्याचे स्पष्ट संकेत महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षानेच दिलेत. राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील सहभागामुळे कुणाची कोंडी होणार आहे? पाहूयात.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsx
Published On

Maharashtra सरकारने हिंदीसक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र विजयोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय.. तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडीला तडे जाण्याची शक्यता निर्माण झालीय.. काँग्रेसने राज ठाकरेंच्या भुमिकेला उघड विरोध करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशाराच दिलाय... तर चेन्निथलांच्या इशाऱ्यानंतर मनसेनंही काँग्रेसची भुमिकाच दुटप्पी असल्याचं सांगत आगपाखड केलीय...

Maharashtra Politics
Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा, कोयत्याने सपासप वार केले अन्...

खरंतर विधानसभा निवडणुकीत मोठा दणका बसल्यानंतर ठाकरे ब्रँड जपण्यासाठी दोघांनी एकीचा सूर धरला....त्यातच हिंदीसक्तीमुळे ठाकरे बंधूंच्या हाती आयतं कोलित मिळालं आणि त्यांनी सरकारविरोधात एकीची वज्रमूठ आवळली... त्यामुळे महायुतीचे धाबे दणाणल्याची चर्चा होती.. तर आता ठाकरे बंधूंच्या युतीमुळे काँग्रेसही अस्वस्थ असल्याचं चित्र आहे... त्याचं नेमकं कारण काय? पाहूयात....

- राज ठाकरेंच्या मविआतील सहभागाने उत्तर भारतीय दुरावण्याची भीती

- मराठी अस्मिता आणि हिंदुत्ववादी भुमिकेमुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता

- राज ठाकरेंसोबत युती झाल्यास मुस्लीम मतदार फारकत घेण्याची भीती

- मविआतील मनसेच्या सहभागाने जागा वाटपावर परिणाम होण्याची शक्यता

Maharashtra Politics
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्या मृत्यूची अफवा, हृदयविकारानं निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल

ठाकरे बंधूंच्या युतीबाबत काँग्रेसही भाजपच्याच वाटेने चालल्याचं चित्र आहे... त्यामुळे 5 जुलैच्या मेळाव्यात ठाकरेंनी युतीची घोषणा केल्यास 7 जुलैला काँग्रेस आपले पत्ते उघड करुन मविआतून बाहेर पडणार का?याकडे सगळ्यांच लक्ष असतानाच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पडलेली फूट ही भाजपच्याच पथ्यावर पडणार का अशी चर्चा आहे...

Maharashtra Politics
Ind Vs Eng 2nd Test : दुसऱ्या सामन्याआधी यू-टर्न! संघाला सोडून गेलेला जोफ्रा आर्चर पुन्हा परतला; इंग्लंडच्या प्लेईंग ११ मध्ये बदल होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com