Mumbai Traffic Saam
मुंबई/पुणे

Mumbai: पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; ५-६ वाहनांची एकमेकांना धडक; अंधेरीजवळ वाहनांच्या रांगा

Western Express Highway Accident Brings Traffic to a Standstill: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळी मोठा अपघात घडला. पाच ते सहा वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसली.

Bhagyashree Kamble

मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळी मोठा अपघात घडला. पाच ते सहा वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. या अपघाताचा परिणाम बोरिवलीहून अंधेरीच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर जाणवतोय. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

आज सकाळी मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळी मोठा अपघात घडला. पाच ते सहा वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसली. या अपघातात काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात घडल्यानंतर वाहतूक कोंडीचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागला आहे.

भीषण अपघात घडल्यानंतर बोरिवलीहून अंधेरीच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, वाहतूक देखील संथगतीने सुरू आहे. साधारणत: १५ ते २० मिनीटात होणाऱ्या प्रवासाला ५० ते ६० मिनिटे लागत आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

वाहतूक विभागाकडून अपघातग्रस्त वाहने मार्गावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरच वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Wrong Transfer: UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे गेले? नियम काय सांगतो? वाचा...

Tea Types: तुम्हीही चहाप्रेमी आहात? मग चहाचे हे 5 प्रकार नक्की ट्राय करा

Government Aircraft : सरकारी हवाई वाहनांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यात येणार? आमदार महेश लांडगे यांचं महापालिका आयुक्तांना पत्र

बनावट इंस्टाग्राम अकाऊंटचा पर्दाफाश; मैत्रिणींचेच अश्लील फोटो केले व्हायरल, महिला वकिलाचा धक्कादायक कारनामा

SCROLL FOR NEXT