Ramesh Pardeshi Saam Tv
मुंबई/पुणे

Ramesh Pardeshi: फक्त 'या' कारणासाठी राज साहेबांना सोडलं, 'मुळशी पॅटर्न'चा पिट्याभाई ढसाढसा रडला; पाहा VIDEO

Ramesh Pardeshi Join BJP: मनसेचे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. राज ठाकरे यांची साथ का सोडली यामागचे कारण त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

Priya More

Summary -

  • ‘मुळशी पॅटर्न’चा पिट्याभाई म्हणजेच रमेश परदेशी यांनी मनसे सोडून भाजपमध्ये प्रवेश केला

  • आरएसएसचा फोटो अपलोड केल्यावर राज ठाकरे यांनी त्यांना खडसावले होते

  • राज ठाकरे यांची साथ का सोडली यामागचे कारण त्यांनी सांगितले

  • राज ठाकरेंविषयी बोलताना ते ढसाढसा रडले

मराठी चित्रसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि 'मुळशी पॅटर्न' चित्रपटातील पिट्याभाई म्हणजेच रमेश परदेशी यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. मराठी कलाकारांसाठी काम करण्यासाठी एक मोठा मंच मिळावा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फोटो अपलोड केल्याने राज ठाकरे यांनी खडसावले होते. या कारणासाठी खूप विचार करून भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची भूमिका रमेश परदेशी यांनी सांगितली.

१३ वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद भूषविलेले रमेश परदेशी यांनी मनसे सोडताना काय काय झालं हे साम टीव्हीला सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. पिट्याभाईने सांगितले की, 'ती बैठक त्यानंतर ते बोलणं यातून प्रश्न तिथे पुन्हा तोच आला की मी स्वयंसेवक आहे संघाचा आणि मी ते का करतोय? मी ते करतोय तर मी इथे का आहे? त्या दिवशी मी स्पष्ट सांगितले की संघ हा संस्काराचा भाग आहे आणि तो विचारांचा भाग आहे. पण इथे पॉलिटिकल आयडॉल म्हणून आणि हा माणूस काय तरी भारी करू शकतो असे आपले पहिले प्रेम राजसाहेब आहेत. १८ वर्षे झाली त्यांच्यासोबत काम करत होतो.'

रमेश परदेशी म्हणाले की, 'पण मला कळाला नाही की ऐवढ्या वर्षानंतरहा प्रश्न आज का आला. स्वयंसेवक आहे हा गुन्हा कधीपासून झाला. त्यादिवशी घडलेली घटना त्या घटनेने खूप विचार करायला भाग पाडले. त्यांनी बोलले मला आपमानास्पद वाटले नाही. तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे ते बोलू शकतात. ते इतके मोठे आहे तर त्यांच्याबद्दल बोलण्याची माझी कुवत नाही. पण थोडं आपण आत्मकेंद्रीत होऊन जेव्हा त्या गोष्टीचा विचार करतो की ऐवढं करून मग हे असे का? विचार हे प्रत्येकाचे असतात आणि ते त्यासोबतच जातात. आपण तन, मन निष्ठेने आपले एफर्ट्स सगळं दिले संघटनेला. मग ते विचार सोडून द्यायचे का? मग आता उरलेला जो काही काळ आहे तो आपण विचारासोबत काढू. त्यामुळे माझ्या मनाला शांती आणि जे काम मला करणं अपेक्षित आहे ते करू.'

तसंच, 'चित्रपटसेनेच्या माध्यमातून जसं काम करण्याचा प्रयत्न केला. पडद्यावर काम करणारे आणि पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांच्या अडचणी सोडवण्याचे काम मी करत होतो. हे आताही मान्य करायला पाहिजे की ते काम सर्वात प्रभावी फक्त राजसाहेबांमुळे होत होते. मनसे सोडण्याचा निर्णय मनावर दगड ठेवून घेतला. राज ठाकरे आणि आमचं नातं एक वेगळे आहे. कारण खरंच मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी कलाकार, मराठी सिनेमा याच्यासाठी मनापासून करणारं कुणी असेल तर ते राजसाहेब आहेत. हा निर्णय ७० टक्के भावनिक आणि ३० टक्के प्रॅक्टिल आहे. राज ठाकरे यांना सोडणे हे अजूनही पचवता येत नाहीये. डोळ्यातून अश्रू बाहेर काढू शकत नाही. ते डोळ्यात तरंगत आहेत. पण त्यांच्यासाठी सर्व दिले. २० वर्षांतील आयुष्यातील वेळ जो उमेदीचा असतो तो दिला. पण आता एक आहे. आता काहीही झाले तरी आपल्या विचारांसोबत राहणे योग्य वाटले.' असे म्हणत रमेश परदेशी यांनी आपले मत स्पष्टपणे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: तिशीत Single आहात? परफेक्ट पार्टनर शोधताय? मग 'या' सिक्रेट टिप्स ठरतील फायदेशीर

Winter Ear Care Tips: थंडीच्या दिवसात कानांची काळजी कशी घ्यावी?

Sinnar Bus Stand Accident: एसटी बस थेट स्थानकात असलेल्या प्रवाशांच्या गर्दीत घुसली; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

PMचा PA बनायचंय? कशी होते पर्सनल सेक्रेटरीची निवड, किती असतो पगार?

Maharashtra Live News Update: बदलापुरात शिंदेसेनेचा कॉंग्रेसला दणका

SCROLL FOR NEXT