MSRTC Bus Saam TV
मुंबई/पुणे

दिवाळीनिमित्त महामंडळाकडून १५०० जादा बसेस; ज्येष्ठ नागरिकांचा मोफत प्रवासही सुरुच

दिवाळीमध्ये महाविद्यालयांसह शाळांना सुट्टी असते, त्यामुळे अनेक जण आपल्या कुटुंबासह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे प्लॅनिंग करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे -

मुंबई: दिवाळी (Diwali) आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) यंदा राज्यभरात 'दिवाळी स्पेशल' १ हजार ४९४ जादा बसेस (Bus) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra State Road Transport Corporation)

त्यानुसार, दि.२१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या बसेस धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी दिली आहे. मध्यवर्ती कार्यालयातील वाहतूक खात्यामार्फत दि.२९ सप्टेंबर, २०२२ रोजी सर्व विभागांना दिलेल्या आदेशानुसार जादा बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्याअसून सर्व प्रवाशांनी या जादा बसेसचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील महामंडळाकडून करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ -

ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुरुच -

दरम्यान, एसटी महामंडळाने 'अमृत ज्येष्ठ नागरिक' योजनेतंर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास लागू केला आहे. तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात जेष्ठ नागरिकांनीही या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दिवाळीमध्ये महाविद्यालयांसह शाळांना सुट्टी असते, त्यामुळे अनेक जण आपल्या कुटुंबासह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे प्लॅनिंग करतात शिवाय नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात.

अशावेळी हे सर्व प्रवाशी ST ला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता महामंडळाने दरवर्षी प्रमाणे नियमित बस फेऱ्या बरोबरच प्रवासी गर्दी लक्षात घेऊन १ हजार ४९४ जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.

प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. मात्र, सध्या औरंगाबाद विभागातून ३६८, मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ गाड्या सोडण्यात येतील, असे श्री. चन्ने यांनी सांगितले. बसच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा बरोबरच msrtc mobile reservation App चा वापर करावा असंही महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranjeet Kasle : झुकेगा नहीं.. बीडच्या रणजीत कासलेच्या मुसक्या आवळल्या, अटक करताच केली पुष्पाची स्टाईल

Diwali 2025: दिवाळीच्या दिवशी 'ही' 5 कामं नक्की करा; घरात लक्ष्मीचं होईल आगमन

Gold Rate: १० वर्षात १ लाखानं वाढलं सोनं, २०१५ मध्ये किती रूपये तोळा होतं गोल्ड? वाचा १०० वर्षाचा इतिहास

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा असंवेदनशीलतेचा कळस, उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला ज्यूस!

SCROLL FOR NEXT