Gopichand Padalkar Vs Sharad Pawar, Uddhav Thackeray
Gopichand Padalkar Vs Sharad Pawar, Uddhav ThackeraySaam TV

गोपीचंद पडळकरांची शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, मशालीपेक्षा खंजीर सहजपणे...

राज्यभरात सध्या शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाला दिलेल्या मशाल आणि ढाल-तलवार चिन्हांची चर्चा सुरु आहे.
Published on

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीनीकरण करून शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि राष्ट्रवादी एकत्रित करून त्यांना खंजीर चिन्ह द्यायला पाहिजे होतं, जेणेकरून लोकांच्या सहजपणे लक्षात आलं असतं अशी बोचरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंसह शरद पवारांवर (Sharad Pawar) केली आहे. ते बारामतीमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यभरात सध्या शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाला दिलेल्या मशाल आणि ढाल-तलवार चिन्हांची चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीकडून ढाल-तलवार म्हणजे भाजपची ढाल आणि ईडीची तलवार असा आरोप शिंदे गटावर करण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ -

अशातच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चिन्हावरुन टीका केली आहे. पडळकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण करून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी एकत्रित करून त्यांना खंजीर चिन्ह द्यायला पाहिजे होतं, जेणेकरून लोकांच्या सहजपणे लक्षात आलं असतं. (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray)

मशाल हे चिन्ह रुजवायला त्यांना वेळ लागेल. खंजीर म्हटलं तर लोकांच्या लक्षात आलं असतं की राष्ट्रवादीचा हा जन्मच खंजिरातून झालेला आहे अशी बोचरी टीका त्यांनी शरद पवारांवर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com