Maharashtra Board HSC Results 2025  
मुंबई/पुणे

HSC Result 2025: ऑल द बेस्ट! आज जाहीर होणार बारावीचा निकाल, कुठे पाहाल रिझल्ट?

Maharashtra HSC 12th Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज 1 वाजता mahresult.nic.in आणि Digilocker वर जाहीर होणार आहे. यंदा 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

Namdeo Kumbhar

Maharashtra Board HSC Results 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. बोर्डाकडून सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाबाबातची माहिती देण्यात येणार आहे. आज दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल (Maharashtra board 12th result date and time) ऑनलाइन पाहाता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्य मंडळाचा हा निकाल 'https://results.digilocker.gov.in' आणि 'https://mahahsscboard.in' या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. राज्य मंडळाने यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करत नवा विक्रम केला आहे.

एकूण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. या संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

बारावीचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे:

- https://results.digilocker.gov.in

- https://mahahsscboard.in

- http://hscresult.mkcl.org

-https://results.targetpublications.org

- https://results.navneet.com

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाच्या प्रकटनामध्ये देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

SCROLL FOR NEXT