Sanjay Raut
Sanjay Raut saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut News: आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणाची चौकशी एका दिवसात का थांबली? संजय राऊत यांचा रोख कुणाकडे?

जयश्री मोरे

INS Vikrant Fund Scam News : आप नेते, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनिष सिसोदिया यांच्या अटकेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणाची चौकशी एका दिवसात का थांबली, असा सवाल उपस्थित करत भाजपवर टीका केली. (Latest Marathi News)

संजय राऊत यांनी मुंबई प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिले. संजय राऊत म्हणाले, 'दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांचा पक्ष केंद्र सरकारला विचारतात. केंद्रीय यंत्रणाचा वापर करायचा हे बेफाम काम सुरू आहे. महाराष्ट्रात पोलीस यंत्रकणाचा वापर करणे सुरू आहे. कर्नाटक, दिल्ली बिहार पश्चिम बंगाल अशा राज्यात हे काम सुरू आहे. निवडणुका जशा जवसाजवळ येतात कारवाई वाढतात'.

'उमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी शिक्षण मंत्री म्हणून खूप चांगले काम केले आहे. जगाला हेवा वाटेल असे काम केले. ते त्यांचे निर्णय नव्हते ते कॅबिनेटचे आहे. अनिल देशमुख, छगन भुजबळ यांना अशाच निर्णयाबाबत अटक केली. त्याना आबकारी खात्याच्या एका निर्णयासाठी अटक केली.परवा अरविंद केजरीवाल आले त्यांनी सांगितले की आपण धीराने लढले पाहिजे , असे संजय राऊत म्हणाले.

भाजपवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, 'तुमच्या पक्षात काय सगळे संत महात्मे आहेत का? महाराष्ट्रात झाड हलवले तर भ्रष्टाचाराचे शेकडो प्रकरण बाहेर पडतील. आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावावर भ्रष्टाचार केला. त्या प्रकरणाची एका दिवसात चौकशी थांबली'. 'ती चौकशी का थांबवली? तुमच्या कडे काय सगळे संत महात्मे आहेत का? असं सवाल करत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.

'तुम्ही जो पायंडा पाडलाय. तो घातक आहे. दुसऱ्याचे सरकार आले तर तुम्हाला कोण वाचवेल. तुमच्याकडे आलेल्या लोकांना निर्मला वॅाशिंग मशीन मध्ये टाकायचे चौकशी थांबवायचे . मुख्यमंत्र्यांवर आहे. आशिष शेलार यांनी तक्रार दिली होती. त्यांच्यावर काय आरोप काय आहे ते पहा. नगरविकास खात्याचे भष्ट्राचार आहे ते पहा. फक्त विरोधकांचे प्रकरण दिसतात, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, सध्याच्या पक्ष स्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले, 'या सगळ्यातून आम्हाला पुढे जायचे आहे. पुन्हा नव्याने पक्ष ऊभा करणे हे महत्वाचे आहे. काल चिन्ह नाही पक्षाचे नाव नाही तरी लोक जमतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर जमतात'.

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राऊत म्हणाले, ' मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकले नाही. तुम्ही त्यांचे सरकार वैध आहे हे कसे म्हणालं. त्यांना भीती आहे. अपात्रतेची त्यामुळे ते विस्तार करत नाही. त्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. निवडणूक आयोगाने शेण खाल्ले, पण आम्हाला सर्वोच्च न्यायालय आशेचा किरण आहे'.

'मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. ते गुवाहाटीला गोव्यापासून त्यांच्या तोंडाला रक्त लागले आहे. उलट आमच्या सरकारने सुडाने कारवाई करायचे नाही असे सांगितले होते. त्यामुळे संथगतीने चौकशी झाली होती. नाही तर अटक करता आली असती. इतके मोठे ते प्रकरण आहे, असे राऊत पुढे म्हणाले.

'आयएनएस विक्रांतच महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा झाला. नवे सरकार येताच सगळ्या प्रकरणावर क्लीन चीट दिली. क्लीन चिट देणे हाच मोठा घोटाळा आहे. कुणी तरी कोर्टात जायला पाहीजे. फडणवीस आणि महाजन यांना अटक करण्याचा काही विषय नव्हता. तसं असेल तर याचा अर्थ तुम्ही त्यात सहभागी होता. तेव्हा तोंड गप्प करून का बसला होतात. उद्धव ठाकरे अत्यंत संयमी नेतृत्व होते. ते संयमाने काम करत होते, असेही पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT