Weather Update : देशातील ६ राज्यात उन्हाचा कडाका वाढणार; जाणून घ्या, आज कसं असेल हवामान?

देशभरात फेब्रुवारी महिन्यापासूनच हवामानात बदल दिसून येत आहे.
Temperature Update
Temperature UpdateSaam Tv

नवी दिल्ली : देशभरात फेब्रुवारी महिन्यापासूनच हवामानात बदल दिसून येत आहे. अनेक राज्यात गुलाबी थंडीच्या ऐवजी तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यातच अनेक राज्यात तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी तापमान ३५ अंश सेल्सिअस पर्यंत येऊन ठेपलं आहे. त्यामुळे नागरिकांना हिवाळ्याच्या महिन्यात उन्हाळ्याचा अनुभव येऊ लागला आहे. (Latest Marathi News)

हिवाळा ऋतु संपण्याच्या आधीच अनेक राज्यातील नागरिकांना उन्हाळ्याचा अनुभव येऊ लागला आहे. गुलाबी थंडी असलेल्या राज्यातील नागरिकांना उन्हाचा अनुभव येत आहे. बदलत्या हवामानाचा (Weather) फटका गव्हाच्या पिकाला बसण्याची शक्यता आहे.

Temperature Update
Manish Sisodia Arrested: आमचा संघर्ष आणखी बळकट होईल; मनीष सिसोदिया यांच्या अटकेवर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया

देशाची राजधानी दिल्लीमध्ये १३ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. यावेळी आकाश निरभ्र राहील. पावसाची अजिबात शक्यता नाही.

लखनऊमध्ये किमान तापमानाची शक्यता १४ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. चंदीगडमध्ये किमान तापमान १६ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तापमान नोंद होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या ट्विटनुसार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कमाल तापमान हे ३५ ते ३७ अंश सेल्सिअस नोंद होण्याची शक्यता आहे. तर उत्तर पश्चिम आणि मध्य भारतातील राज्यात तापमान रोजच्या तापमानापेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअस अधिक नोंद होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com