Manish Sisodia Arrested: आमचा संघर्ष आणखी बळकट होईल; मनीष सिसोदिया यांच्या अटकेवर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया

Manish Sisodia Arrested: मनीष सिसोदिया यांच्या अटकेवर आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Arvind Kejriwal's reaction to Manish Sisodia's arrest
Arvind Kejriwal's reaction to Manish Sisodia's arrestsaam tv

Manish Sisodia Arrested: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळा प्रकरणात 8 तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने अटक केली आहे. सीबीआय तपासात सिसोदिया सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात आले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

मनीष सिसोदिया यांच्या अटकेवर आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनीष निर्दोष असून जनता त्याचे उत्तर नक्कीच देईल. यामुळे आमचा संघर्ष आणखी मजबूत होईल असे केजरीवाल म्हणाले.

Arvind Kejriwal's reaction to Manish Sisodia's arrest
Delhi: मोठी बातमी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक; 8 तासाच्या चौकशीनंतर CBI ची कारवाई

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटले की, 'मनीष निर्दोष आहे. त्यांची अटक हे गलिच्छ राजकारण आहे. मनीष यांच्या अटकेमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रत्येकजण हे पाहत आहे. लोकांना सर्व काही समजत आहे. लोक याला उत्तर देतील. यामुळे आमचे मनोबल आणखी वाढेल. आमचा संघर्ष आणखी मजबूत होईल'. (Latest Marathi News)

Arvind Kejriwal's reaction to Manish Sisodia's arrest
Mumbai: एकनाथ शिंदें आता ठाकरे आडनाव लावणार का? वरळीच्या सभेत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी देखील ट्वीट करून यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'मनीष सिसोदिया यांची अटक ही हुकूमशाहीची उंची आहे. मोदीजी एका चांगल्या व्यक्तीला आणि उत्तम शिक्षणमंत्र्यांना अटक करून तुम्ही चांगले केले नाही. देवसुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. मोदीजी एक दिवस तुमची हुकूमशाही नक्कीच संपेल', असे ट्वीट त्यांनी केले आहे. (Latest Political News)

अटक होण्याआधी सिसोदिया यांनी ट्वीट करत म्हटलं होत की, ''आज पुन्हा सीबीआय मुख्यालयात जात आहे, मी तपासात पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचे प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत.'' त्याच ट्विटमध्ये ते म्हणाले की, ''मला काही महिने तुरुंगात राहावे लागले तरी मला पर्वा नाही. देशासाठी ज्या भगत सिंहांना फाशी देण्यात आली त्यांचा मी अनुयायी आहे. अशा खोट्या आरोपांमुळे तुरुंगात जाणे ही छोटी गोष्ट आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com