Mumbai: एकनाथ शिंदें आता ठाकरे आडनाव लावणार का? वरळीच्या सभेत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

आम्ही आता महाराष्ट्रात फिरतोय, आम्ही लढतोय आणि जिंकणार म्हणजे जिंकणार," असा विश्वासही त्यांनी यावेळी केला.
Sushma Andhare News
Sushma Andhare News Saam Tv

Mumbai: आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची वरळीतील जांभोरी मैदानावर होत आहे. ठाकरे गटाकडून ''शिवसेना' (ShivSena) नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह गेल्यानंतर आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्याआधी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर आणि थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

Sushma Andhare News
Delhi: मोठी बातमी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक; 8 तासाच्या चौकशीनंतर CBI ची कारवाई

काय म्हणाल्या सुषमा अंधारे...

वरळीतील या जाहीर सभेत सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेवर सडकून टीका केली. "मला वरळी नवीन नाही. माझं आणि वरळीशी माझं नवीन नात आहे. किती तरी नाव आहेत जी वरळीशी जोडलेली आहेत त्यांना मी जोडलेली आहे. मी विजयादशमीच्या मुहूर्तावर बोलत होते तेव्हा म्हटलं होतं इलाखा तुम्हारा धमाका हमारा स्टाईल हेै, " असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

मुख्यमंत्री शिंदेवर केली टीका..

"आमचं मूल्य मराठी माणसाचं हित महाराष्ट्राचा मान सन्मान जपणे आहे. हे मूल्याधिष्टीत राजकारण बाळासाहेबांनी शिवसैनिकांमध्ये रुजवलं, आता शिंदे साहेब आडनाव बदलून ठाकरे लावतील का? एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) आता ठाकरे आडनाव लावायची वेळ येईल का विचार करावं लागेल," अशी टीका त्यांनी यावेळी केली

Sushma Andhare News
Eknath Shinde: 'म्हणून त्यांच्या पोटात दुखतं...' CM शिंदेचा अजित पवारांवर हल्लाबोल

दरम्यान, "चिन्ह आणि पक्ष गेलं तरी आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे, म्हणूनच या सभेला अशी प्रचंड गर्दी झाली असून हा आदित्योदय आहे," अशी गर्जनाही यावेळी त्यांनी केली. तसेच "आम्ही आता महाराष्ट्रात फिरतोय, आम्ही लढतोय आणि जिंकणार म्हणजे जिंकणार," असा विश्वासही त्यांनी यावेळी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com