Eknath Shinde: 'म्हणून त्यांच्या पोटात दुखतं...' CM शिंदेचा अजित पवारांवर हल्लाबोल

सोमवारपासून, राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSAAM TV
Published On

Mumbai: सोमवारपासून, राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी हे मुद्दे या अधिवेशनात गाजताना दिसतील. त्याआधी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी अधिवेशनात होणाऱ्या निर्णयांवर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Cricket News: गोलंदाज जोमात, फलंदाज कोमात; ऑस्ट्रेलियाच्या संघाने 6 चेंडूत गमावल्या 5 विकेट

"उद्यापासून सुरू होत असलेल्या अधिवेशनात लोकहिताचे निर्णय घेतले जातील. विरोधकांनी विधीमंडळात लोकहिताचे मुद्दे मांडवेत. त्यांच्या प्रश्नावर उत्तरं द्यायला आम्ही तयार आहोत," असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

त्याचबरोबर "विरोधी नेत्यांना धमकी देण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. त्याची चौकशी करण्यात येईल. परंतु, संजय राऊत हे सनसनाटी निर्माण करण्यासाठी असं काही तरी वक्तव्य करत असतात," असा आरोप यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला..

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Crime News: क्रूरतेचा कळस! प्रेयसीला मेसेज केल्याने चिरला मित्राचा गळा, हृदय बाहेर काढलं अन्...

एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना टोला..

यावेळी बोलताना "विरोधकांनी आज चहापानावर बहिष्कार घातला. त्यांच्यासोबत चहापान टळलं हे बरंच झालं. सत्ता गेल्यामुळे विरोधक वैफल्यग्रस्थ झाले आहेत. त्यामुळे आम्ही समजू शकतो," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 

तसेच "नारायण राणे यांना जेवत्या ताटावरून उठवलं, केतकी चितळेला तुरूंगात टाकलं, कंगना रणौतच घर तोडलं. गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीस यांना तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, आमच्यावर आता खोटेनाटे आरोप करत आहेत. आम्हाला लोकांचं प्रेम मिळत आहे," त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पोठात दुखत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com