Australia Domestic Women Cricket Match: क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं. क्रिकेटचे काही सामने तर श्वास रोखणारे ठरतात. विशेषत: टी-20 क्रिकेटमुळे या खेळातील रोमांच आणखी वाढला आहे.
शेवटच्या षटकात 4 धावांची गरज असेल आणि 5 विकेट शिल्लक असतील तर तो संघ सहज विजयी होईल असे मानले जाते. परंतु ऑस्ट्रेलियात अशाच एका सामन्यात गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. मैदानावरील प्रेक्षकांचा श्वास रोखून धरणारा हा सामना ठरला.
शेवटच्या षटकात घेतल्या 5 विकेट
ऑस्ट्रेलियातील होबार्ट येथे महिलांच्या डोमेस्टिक लिस्ट-ए स्पर्धेत अतिशय रोमांचक अंतिम सामना (South Australia vs Tasmania) पाहायला मिळाला. दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाला शेवटच्या षटकात 4 धावा करायच्या होत्या, पण त्यांनी एकामागून एक 5 विकेट गमावल्या. त्यामुळे तस्मानियाच्या महिला संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार 50 षटकांचा हा सामना एका धावेने जिंकला. तस्मानियाचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे. दोन्ही वेळा या संघाने अंतिम फेरीत दक्षिण ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. (Latest Sports News)
पहिल्या 4 चेंडूत 3 विकेट आणि एक धाव
दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या डावातील ४७ वे षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज सारा कोयत आली. पहिल्याच चेंडूवर किने अॅनी ओ'नीला क्लीन बोल्ड केले. दुसऱ्या चेंडूवर साउथ ऑस्ट्रेलियाने एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर जिमी बर्सी यष्टीचीत झाली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर धावबाद अमांडा झाली. अशा प्रकारे पहिल्या 4 चेंडूंवर फक्त एक धाव झाली आणि 3 विकेट पडल्या.
शेवटच्या 2 चेंडूवर 2 विकेट
यानंतर 2 चेंडूत 3 धावांची गरज असताना पाचव्या चेंडूवर साराने एला विल्सनला एलबीडब्ल्यू बाद करून दक्षिण ऑस्ट्रेलियाला 9वा धक्का दिला. दक्षिण ऑस्ट्रेलियाला विजेतेपदासाठी शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती. परंतु शेवटच्या चेंडूवर अलिसू मुसवांगा केवळ एक धाव करू शकली आणि तीही धावबाद झाली. यामुळे संपूर्ण संघ 47 षटकांत 241 धावांवर गारद झाला. (Cricket News)
सारा ठरली प्लेअर ऑफ द मॅच
या सामन्यात तस्मानियाने प्रथम फलंदाजी करताना 264 धावा केल्या. परंतु दुसऱ्या डावात पावसामुळे व्यत्यय आला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण ऑस्ट्रेलियाला 47 षटकांत विजयासाठी 243 धावांचे लक्ष्य मिळाले. या सामन्यात 30 धावा देऊन 4 विकेट घेणाऱ्या साराला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.