Raj Thackeray News
Raj Thackeray Newssaam tv

Mumbai: मनसेला मोठा धक्का! राज ठाकरेंना पत्र लिहित बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्यांना याचा फटका देखील बसण्याची शक्यता आहे.
Published on

MNS: मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे. यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्यांना याचा फटका देखील बसण्याची शक्यता आहे. मनसेचे मसल मॅन मनीष धुरी यांनी आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. (Mumbai)

Raj Thackeray News
Ajit pawar : मनसेच्या आमदाराने म्हणावं का? पक्ष आणि इंजिन माझंच; पवारांची निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मिश्किल टिप्पणी

याबाबत अधिक माहिती अशी की, मनसेचे मसल मॅन अशी ओळख असलेल्या मनिष धुरी यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) पत्र लिहून तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मनिष धुरी हे मनसेचे अंधेरी विभागाचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच मनिष धुरी हे राज ठाकरेंचे भारतीय विद्यार्थी सेनेपासूनचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

त्यांच्या अशा तडकाफडकी राजीनाम्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. आता धुरी यांच्या जागी अंधेरी विभाग अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे जाणार? अशी चर्चा रंगली आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही होण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray News
NCP News: राष्ट्रवादीचे टाळमृदंग वाजवून आंदोलन; औसा शहरात दहा दिवसापासून पाणी बंद

गटबाजीमुळे दिला राजीनामा...

दरम्यान, पश्चिम उपनगरातील पक्षांतर्गत गटबाजीमुळेच धुरी यांनी राजीनामा दिल्याची कुजबुज आहे. पक्षानं दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनीष धुरी यांनी या पत्रात राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. वैयक्तिक कारणामुळे सर्व पदांचे राजीनामे देत आहे.

तसेच पक्षात यापुढे राज ठाकरे समर्थक म्हणून काम करेल, अन्य राजकीय पक्षात जाणार नसल्याचं मनीष धुरी यांनी या पत्रात म्हटलं आहे.

(Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com