NCP News: राष्ट्रवादीचे टाळमृदंग वाजवून आंदोलन; औसा शहरात दहा दिवसापासून पाणी बंद

राष्ट्रवादीचे टाळमृदंग वाजवून आंदोलन; औसा शहरात दहा दिवसापासून पाणी बंद
NCP News
NCP NewsSaam tv

लातूर : जिल्ह्यातील औसा नगरपालिकेने महावितरणचे (Mahavitaran) पाणी पुरवठ्याचे वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा बंद केला आहे. यामुळे औसा शहराला पाणी टंचाई असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांसह आंदोलन केले आहे. (Letest Marathi News)

NCP News
Nagpur Crime News: अतिक्रमणातून महिलेचा खून; सकाळी झालेल्‍या वादातून कृत्‍य

औसा शहरात थकीत वीजबिलापोटी दीड महिन्यात तिसऱ्यांदा पाणी पुरवठ्याचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. त्यामुळे शहरात सहा दिवसांपासून निर्जळी आहे. तसेच घंटागाड्या बंद असल्याने शहरातील कचरा व्यवस्थापन कोलडमले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी भजनांतून प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला.

प्रशासकाचे ढिसाळ नियोजन

औसा शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणी आणि जलशुध्दीकरण केंद्र या दोन्ही ठिकाणचा वीज बिल भरले नसल्यामुळे विद्युत पुरवठा बंद केला आहे. सध्याला नगरपालिकेवर प्रशासक असून त्याच्या ढिसाळ नियोजन आणि कारभारामुळे शहरातील नागरिकांवर पाणी टंचाईची वेळ आली असून दहा दिवसापासून पाणी बंद आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिकांनी टाळ मृदंगासह भजन करत आंदोलन केले आहे. पालिका प्रशासनाविरोधात घोषणा दिल्‍या. तसेच भजनातून पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com