Sanjay Raut : 'सत्ताधाऱ्यांना परभवाची भीती असली की...'; संजय राऊत यांचा घणाघात

पुण्यातील पोटनिवडणुकीच्या मतदानावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSaam TV

Sanjay Raut on Kasba Bypoll Election : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने या दोन्ही जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी आज (२६फेब्रुवारी) मतदान होत आहे.

रविवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत दोन्ही मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कसबा पोटनिवडणुकीत एकूण १६ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुण्यातील पोटनिवडणुकीच्या मतदानावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं.

Sanjay Raut News
Sanjay Raut : 'स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केल्यावर....'; संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात

'पुण्यात मतदानाची टक्केवारी आता जरी कमी असली तरी नंतर वाढणार आहे. आज रविवार असून पुणेकर (Pune) एकदा मैदानात उतरले की रांगा लागणार. पुणेकरांचा प्रचारात मोठा प्रतिसाद होता. 5 ते 6 मंत्री प्रत्येक मतदारसंघात आहेत. सरकारी यंत्रणांचा वापर केला जातोय. परभवाची भीती असली की दबावतंत्र वापर केला जातो', असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. प्रचाराच्या दरम्यान चिंचवड आणि कसब्यात मोठा जल्लोष दिसला. त्यामुळे पुणेकर घरी बसणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut News
Buldhana News: मुद्दल, व्‍याज देवूनही सावकाराचा जाच; जमिन परत देत नसल्‍याने बळीराजाने संपवली जीवनयात्रा

चिंचवड पोटनिवडणुकीत धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. यावर संजय राऊत म्हणाले, धक्काबुक्की होईल, वाद होतील. कारण सरकारकडून पाच ते सहा मंत्री मतदार संघात जाऊन बसले आहेत. याची काही गरज आहे का? प्रशासनावर यंत्रणांवर दबाव आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पराभवाची भीती दिसली की लोकांना गोंधळ घालण्यास प्रवृत्त केलं जात आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com