Motilal Nagar Redevelopment: Mhada Master Plan With 15 Acres Of Green Space saam tv
मुंबई/पुणे

मोतीलाल नगरचा कायापालट! मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी म्हाडाचा 'मास्टर प्लॅन'

Motilal Nagar Redevelopment: गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर 1, 2 आणि 3 वसाहतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. प्रकल्पातून सुमारे 15 एकर हरित क्षेत्राची निर्मिती होणार आहे.

Bharat Jadhav

  • मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी म्हाडाचा मास्टर प्लॅन

  • गोरेगाव पश्चिम मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाची माहिती

  • मोतीलाल नगर पुनर्विकासात 15 एकर हरित क्षेत्र

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) हाती घेतलेल्या गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या वसाहतींच्या पुनर्विकास प्रकल्पातून तब्बल १५ एकर हरित क्षेत्राची निर्मिती होणार आहे. म्हाडाने मागील काही काळापासून समूह (क्लस्टर) पुनर्विकासावर भर दिलाय. अनेक ठिकाणी मोठ्या व सलग टाऊनशिप्सच्या उभारणीचा मार्ग मोकळा होतो आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना प्रशस्त घरे मिळण्यासोबतच मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र निर्माण करणेही शक्य होत आहे. मोतीलाल नगर हे या मॉडेलचे उत्तम उदाहरण म्हणून प्रस्थापित होत आहे.

गोरेगावसारख्या पश्चिम उपनगरातील ऐन मध्यवर्ती, दाटीवाटीच्या परिसरातील गृहनिर्माण प्रकल्पात अशा मोठ्या प्रमाणातील हरित क्षेत्र मुंबईतील उत्तर-पश्चिम उपनगरांच्या ‘ऑक्सिजन’मध्ये भर घालणार असून, येथील रहिवाशांच्या आरोग्य व पर्यावरणपूरक जीवनशैलीकरिता महत्वाचे ठरणार आहे.

सुमारे १४३ एकर भूखंडावरील या वसाहतींचा पुनर्विकास म्हाडाद्वारे सी अँण्ड डीए (बांधकाम व विकास संस्था) मॉडेलवर होत आहे. काही महिन्यांपूर्वीच या प्रकल्पाचा मास्टर प्लान (समग्र विकास आराखडा) रहिवाशांना सादर करण्यात आला होता. गोरेगाव पश्चिम येथील न्यू लिंक रोड लगत मोतीलाल नगर १ आणि मोतीलाल नगर २, ३ असे दोन भूखंड आहेत. या वसाहतींतील मिळून सुमारे ३७०० म्हाडा सदनिकाधारक रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प हा राज्य सरकारमार्फत राबवण्यात येणारा देशातील सर्वांत मोठा असून हा सुमारे १ लाख कोटी रुपये किंमतीचा ‘ब्राऊनफिल्ड’ गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या मास्टर प्लाननुसार येथील १५ एकरांचे हरित क्षेत्र हे या वसाहतीच्या एकूण भूखंडाच्या १० टक्क्यांहून अधिक आहे.

पुनर्वसन इमारतींच्या पोडीयम स्तरावरील मुख्य, मोठ्या हरित क्षेत्रांसह वसाहतीतील अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणात हरित जागा असणार आहेत. यांसह रस्ते, पादचारी मार्ग यांच्या लगत भरपूर वृक्षलागवड करून वृक्ष-आच्छादित मार्गांचीही निर्मिती करणार असल्याचे म्हाडाने म्हटले आहे.

मोतीलाल नगर वसाहतींत सध्या असलेल्या तब्बल १५०० हून अधिक वृक्षांची तोडणी न करता त्यांचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय म्हाडाने घेतला आहे. यामध्ये भेंड (इंडियन ट्युलिप), कडुलिंब, वड, कदंब, जांभूळ, उंबर, आंबा, फणस, नारळ, सप्तपर्णी, देशीबदाम अशा अनेक भारतीय प्रजातींच्या वृक्षांचे संवर्धन होणार आहे. “क्लस्टर (समूह) पुनर्विकास म्हणजे केवळ नवीन घरे उभारणे नव्हे, तर सर्वांगीण सक्षम नागरी वसाहत उभी करणे आहे. मोतीलाल नगरमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा, शाश्वत नियोजन आणि सुमारे १५ ते १७ एकरांवरील हरित क्षेत्राच्या निर्मितीवर विशेष भर देण्यात येत असल्याचं संजीव जयस्वाल, उपाध्यक्ष व सीईओ, म्हाडा म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Rule: घरगुती एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी नवा नियम; आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनिवार्य

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला, पण परतलाच नाही; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

IIT पवईत विद्यार्थ्याची आत्महत्या, साहिलला छळ करून मारल्याचा आईचा आरोप

Saam Impact : साम टीव्हीच्या दणक्याने महापालिका प्रशासन खडबडून जागे; सर्कलवरील सर्व बॅनर हटवले|VIDEO

तुमची BPची गोळी नकली? पॅरासिटामॉलच्या टॅबलेटही बनावट?

SCROLL FOR NEXT