Schools closed in mumbai  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Schools Closed Tomorrow : मुंबईत वरुणराजा धो धो बरसला, शहरांतील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Mumbai Schools Closed Tomorrow due to heavy rain: मुंबईत वरुणराजा धो धो बरसला आहे. जोरदार पावसामुळे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईला आज बुधवारी मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलं आहे. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे. हवामान विभागाने उद्या देखील मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने गुरुवारी मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील याबद्दल माहिती दिली आहे.

मुंबईला गेल्या काही तासांत कोसळलेल्या धुव्वादार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. दुसऱ्या दिवशी देखील हवामान विभागाने मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे पालिकेने शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

हवामान विभागाकडून उद्या मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने मुंबई शहराला सकाळी ८.३० पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या गुरुवारी २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच आवश्यकता असेल तर नागरिकांनी घराबाहेर पडावे,असं आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलं आहे. ठाणे जिल्ह्यातील शाळांना या क्षणापर्यंत तरी सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.

मुंबईत मुसळधार पाऊस, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद

मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील तासाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवे सखल भाग असल्यामुळे पाण्याखाली गेला आहे. तर सबवेत तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचलं आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या सबवेत पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

मुंबईचा पश्चिम उपनगरातील फिल्म सिटी रोड परिसरातील ओबेरॉय मॉल समोरील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्त्यांना नद्यांचा स्वरूप प्राप्त झालं आहे. रस्त्यावर अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी साचल्यामुळे पायी चालणाऱ्या आणि वाहने घेऊन जाणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT