kalyan , fire, fire brigade saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Fire News : समर्थ नगर परिसरातील माेबाईल टाॅवरला लागलेली आग विझविण्यात फायर ब्रिगेडला तासाभरानंतर यश

दरम्यान हा मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- अभिजीत देशमुख

Kalyan Fire News : कल्याण (kalyan) पूर्व अडवली गावातील समर्थ नगर परिसरात असलेल्या शिवशक्ती सोसायटीच्या टेरेसवरील मोबाईल टॉवरला (mobile tower) आग (fire) लागल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. फायर ब्रिगेडने (fire brigade) तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

शिवशक्ती सोसायटीच्या टेरेसवरील मोबाईल टॉवरला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजता घडली. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Maharashtra News)

या टॉवरला आग लागल्यानंतर काही क्षणातच भडकलेल्या आगीमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलं होते. रहिवाशांनी इमारतीमधून बाहेर पळ काढला. तब्बल तासाभराच्या प्रयत्नानंतर या मोबाईल टॉवरवरील आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.

टॉवरला आग लागल्यानंतर काही क्षणातच भडकलेल्या आगीमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलं होतं. रहिवाशांनी इमारतीमधून बाहेर पळ काढला. तब्बल तासाभराच्या प्रयत्नानंतर या मोबाईल टॉवरवरील आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.

दरम्यान हा मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला. टॉवर काढून टाकण्याबाबत अनेकदा संबंधित बिल्डरकडे मागणी केली मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील या वेळेस स्थानिकांनी केला. या घटनेमुळे इमारतीवर लावण्यात येणा-या अनधिकृत टॉवरचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT