Swabhimani Shetkari Sanghatana : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना (swabhimani shetkari sanghatana) पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. संघटनेने शेतकऱ्यांच्या (farmers) प्रश्नावरून सरकारला (maharashtra government) अल्टिमेटम दिला आहे. येत्या 22 तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरात चक्काजाम आंदाेलन (aandolan) छेडले जाणार आहे. हे आंदाेलन बीड (beed) जिल्ह्यातील विविध ठिकठिकाणी देखील केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे म्हणाले जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 2020 पासून खरीप, रब्बी हंगामातील थकीत पीकविमा तात्काळ वाटप करावा, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे अनुदान तात्काळ द्यावे, शेतकऱ्यांच्या कापसाला 12 हजार रुपये क्विंटल भाव द्यावा, पिक कर्ज वसुलीसाठी अनेक बँकांनी बचत खाते होल्ड केले असुन ते तात्काळ होल्ड काढावे.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन प्रति हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान तात्काळ द्यावे, सक्तीच्या वीजबिल वसुलीसाठी कृषी पंपाचा खंडित केलेला वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, शेतकऱ्यांच्या पिककर्ज मंजुरीसाठी सीबीलची अट रद्द करावी, केंद्र शासनाचा नियोजित सुरत- चेन्नई राष्ट्रीय महामार्ग जात असणाऱ्या आष्टी तालुक्यातील, 19 गावातील बाधित शेतकऱ्यांना बाजार भावाच्या पाचपट मावेजा द्यावा. (Maharashtra News)
तसेच बाधीत शेतकऱ्यांच्या संमती शिवाय संयुक्त मोजणी व भु संपादन करु नये. जिल्ह्यातील विविध रस्ते, सिंचन, सौर , कर्जमाफी योजनेतून वंचित राहिलेल्या हजारो शेतकऱ्यांची थकित कर्ज माफी करावी, जिल्ह्यातील अत्यंत नादुरुस्त रस्ते, पूल ,जि.प.प्रा. केंद्रीय शाळा तात्काळ नव्याने मंजूर करुन काम चालू करावी.
यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. 22 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण नाही केल्या तर बीड जिल्ह्यातील विविध प्रमुख मार्गावर तीव्र स्वरूपात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. आंदोलनामुळे उदभवणाऱ्या परिस्थितीला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.