Ravikant Tupkar : जेलमधून बाहेर पडताच रविकांत तुपकरांनी उघडले पत्ते, आंदोलन चिघळण्यासाठी... (पाहा व्हिडिओ)

शनिवारी तुपकर यांनी बुलढाण्यात आंदाेलन छेडले हाेते.
Ravikant Tupkar, Akola, Buldhana
Ravikant Tupkar, Akola, Buldhanasaam tv

Ravikant Tupkar Latest Marathi News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkar sanghatana) नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar released from akola jail) यांच्यासह त्यांच्या २५ सहकाऱ्यांची आज (गुरुवार) अकाेला कारागृहात (Akola Jail) सुटका झाली. आत्मदहन आंदाेलन (aandolan) प्रकरणात बुलढाणा न्यायालयाने (Buldhana Court) तुपकरांसह आंदाेलकांचा बुधवारी जामीन अर्ज मंजूर केला हाेता.

Ravikant Tupkar, Akola, Buldhana
Rohit Pawar : डाेळ्यात अंजन घालण्याची गरज, कांद्याच्या दरावरुन राेहित पवारांनी सरकारला फटकारलं

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रचंड आक्रमक झाली आहे. रविकांत तुपकर यांनी शेतक-यांना न्याय मिळावा यासाठी शनिवारी बुलढाणा येथे आंदाेलन केले हाेते. त्यावेळी तुपकर यांना अटक झाली हाेती. त्यानंतर त्यांच्या माताेश्री आणि पत्नी यांनी शेतक-यांसाठी लढा सुरु ठेवला तर तुपकर यांनी जेलमध्ये अन्न त्याग आंदाेलन सुरु ठेवले.

आज रविकांत तुपकर आणि त्यांच्या २५ कार्यकर्त्यांची अकोल्याच्या कारागृहातून सुटका झाली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी कारागृहासमोर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तुपकरांच्या आई आणि पत्नीने त्यांचे औक्षण केले. यावेळी कार्यकर्त्यांना सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. (Breaking Marathi News)

Ravikant Tupkar, Akola, Buldhana
Kalaburagi - Mumbai CSMT Train : कलबुर्गीहून रविवारी मुंबईला विशेष ट्रेन; जाणून घ्या कारण

विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने आंदोलन करत आहे. मध्यंतरी मुंबईच्या जलसमाधी आंदोलनाची दखल सरकारने घेतली. त्यानंतर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या तोंडाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून पाने पुसली गेली.

सरकारने एकतर आम्हांला गाेळ्या घालाव्यात अथवा आत्मदहन करुन द्यावे असा निर्धार करीत आम्ही आंदाेलन छेडले. हे आंदाेलन काेणी चिघळविण्याचा प्रयत्न केला (प्रतापराव जाधव यांचे नाव न घेता) हे सर्वज्ञात आहे असेही तुपकरांनी स्पष्ट केले. शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरुच राहणार आहे. दडपशाही, दबावाखाली येणारे आम्ही नाही असा इशारा रविकांत तुपकरांनी सरकारला दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com