HSC Exam : बारावीच्या परीक्षेचा घेतला ताण; पनवेलमधील विद्यार्थ्याची आत्महत्या

या घटनेमुळे पनवेल परिसरात एकच खळबळ उडाली.
Panvel, Hsc, exam, student
Panvel, Hsc, exam, studentsaam tv
Published On

- सिद्धेश म्हात्रे

HSC Exam : इयत्ता बारावीच्या परिक्षेस आजपासून प्रारंभ झाला. दरम्यान या परिक्षेला घाबरुन राज्यातील दाेन विद्यार्थ्यांनी त्यांचे जीवन संपविले. साेमवारी सायंकाळच्या सुमारास पनवेल येथील एका सतरा वर्षीय मुलाने राहत्या घरात आत्महत्या केली. या घटनेच्या वेळेस त्याच्या आई वडील घराबाहेर हाेते. (Breaking Marathi News)

Panvel, Hsc, exam, student
Aurangabad News: धक्कादायक! बारावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या काही तासाआधीच उचललं टोकाचं पाऊल; औरंगाबादेत खळबळ

बारावीची परीक्षेस आजपासून (मंगळवार २१ फेब्रुवारी) प्रारंभ झाला. या परीक्षेचा (HSC Exam) पहिला पेपर आज झाला. त्यास हजारो विद्यार्थी बसले हाेते. मात्र, परीक्षा सुरू होण्यापुर्वी महाराष्ट्रात दाेन दुर्देवी घटना घडल्या आहेत. औरंगाबाद येथे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. तसेच पनवेल (panvel) येथे दुसरी धक्कादायक घटना घडल्याचे समाेर आले आहे.

Panvel, Hsc, exam, student
Maharashtra Politics : 'कोल्ह्याला द्राक्ष आंबट'; उद्धव ठाकरेंसह अनिल परब, संजय राऊतांवर याेगेश कदमांची टीका

पनवेल येथील वंश नवनाथ म्हात्रे याने अभ्यासाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली. वंश हा देवदर्शन सोसायटीत वास्तव्या हाेता. ताे इयत्ता बारावीत हाेता. आज त्याचा पहिला पेपर हाेता. आई वडील घरात नसताना त्याने आत्महत्या केली. दरम्यान विद्यार्थ्यांनी परिक्षेला घाबरुन जाऊ नये त्यास सामाेरे जावे. स्वत:च्या जीवापेक्षा परिक्षा महत्वाची नाही. त्यामुळे काही अडचण असल्यास पालकांशी संवाद साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमाेद पवार यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com