Raj Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : ...मग बघू कोणाची हिंमत होते; 'नोकरीत मराठी माणूस नको' पोस्टनंतर मनसे आक्रमक

Shalini thackeray on controversial recruiters post : मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तीव्र शब्दात या पोस्टचा निषेध नोंदवला. आता या प्रकरणात मनसेनेही उडी घेतली आहे. 'यासाठी आमची सत्ता गरजेची असून मग बघू कोणाची हिंमत होते, अशा शब्दात मनसेने इशारा दिला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : 'मराठी माणसाला नोकरी मिळणार नाही, या आशयाची रिक्रुटरची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काल विरोधी पक्षातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टवर टीका केली. त्यानंतर सत्ताधारी पक्षातील मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तीव्र शब्दात या पोस्टचा निषेध नोंदवला. आता या प्रकरणात मनसेनेही उडी घेतली आहे. 'यासाठी आमची सत्ता गरजेची असून मग बघू कोणाची हिंमत होते, अशा शब्दात मनसेने इशारा दिला आहे.

गुजरातमधील फ्रिलान्सर रिक्रुटरने ग्राफिक डिझाइनरसाठी व्यक्ती हवा आहे. पण या पदासाठी मराठी भाषिक व्यक्तीचं स्वागत नाही. अशा शब्दात नोकरीसाठी जाहिरात लिंक्डइनवर प्रसिद्ध केली. या जाहिरातील मराठी व्यक्तींचं स्वागत नसल्याच्या आशयावर मराठी तरुणांनी जोरदार टीका केली. काही क्षणार्धात या रिक्रुटरची पोस्ट व्हायरल झाली. सोशल मीडियावर जाहिरातीची पोस्ट व्हायरल होताच सर्वच स्तरातून तिखट प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शालिनी ठाकरे यांनीही 'एक्स' वर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

शालिनी ठाकरे काय म्हणाल्या?

'Indians are not allowed' अशा पाट्या बदलण्यासाठी 'भारतीयांचे' सरकार यावे लागले. 'Marathi not allowed' च्या पाट्या बदलायच्या असतील तर महाराष्ट्रात 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ची सत्ता येणे गरजेचे आहे. मग बघू कोणाची हिंमत होते अशा पाट्या लावायची, अशा शब्दात शालिनी ठाकरे यांनी इशारा दिला.

मंगल प्रभात लोढा काय म्हणाले?

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील 'एक्स' मीडियावर पोस्ट करत या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला. ' महाराष्ट्रात राहून, व्यवसाय करून स्थानिक मराठी माणसांना नोकरी नाकारणे अतिशय निंदनीय आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालून सामाजिक सलोखा राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. म्हणूनच सोशल मीडियावरील या पोस्टचा निषेध करतो. आम्ही स्थानिक भूमिपुत्रांच्या सदैव सोबत आहोत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT