Pune By Election 2023: पुण्यात दोन जागांवर पोटनिवडणूक होत आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत होणार आहेत. मात्र मनसे मात्र पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. (Pune News)
कसबा मतदारसंघात मनसेची चांगली पकड आहे. त्यामुळे कसबा निवडणूक लढावी असा मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आग्रह धरल्याने मनसे या निवडणुकीत सहभाग घेणार नाही.
कसबा मतदारसंघात आतापर्यंत मनसेला चांगले मतदान झाले आहे. त्यामुळे कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढवली तर मनसे फायदा होईल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. हिंदुत्वाच्या भूमिकेवरुन मनसे कसबा विधानसभा जिंकू शकते असा विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवला होता.
कसबा निवडणूक लढण्यासाठी गणेश भोकरे, अजय शिंदे, गणेश सातपुते, आशिष देवधर, निलेश हांडे, प्रल्हाद गवळी, बाळा शेडगे अशी इच्छुकांची मोठी लिस्ट होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.