Pune Byelection: चिंचवड पोटनिवडणुकीत नाना काटेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी, मविआने भाजपसाठी निवडणूक सोपी केल्याची चर्चा

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांनी उमेदवार घोषित करण्यात आली आहे.
Ncp
Ncp saam tv
Published On

Pune Byelection : चिंचवड पोटनिवडणुकीचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवार घोषित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (Pune News)

जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटलं की, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.

Ncp
Cricket News: हात मोडला पण भावानं कॅच नाही सोडला! Video पाहून तुम्हीही म्हणाल.. वाह!

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राहुल कलाटे यांचं नाव चर्चेत असताना आता नाना काटे यांना उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादीसाठी ही जागा सुटली असताना राष्ट्रवादीतील कुणाला तरी उमेदवारी मिळावी असा आग्रह स्थानिक नेत्यांचा होता.

मात्र राहुल कलाटे हे नाना काटे यांच्यापेक्षा ताकदीचे उमेदवारी ठरले असते. कारण मागील विधानसभा निवडणुकीत राहुल कलाटे यांनी भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक मतं मिळवली होती.

Ncp
Aaditya Thackeray : 'वरळीत काय ठाण्यात देखील लढेन'; आदित्य ठाकरे यांनी पुन्हा मुख्यमंत्री शिंदे यांना ललकारलं

कलाटे यांना उमेदवारी मिळाली असती तर अटीतटीची ही लढाई झाली असती. कलाटे यांना उमेदवारी मिळाली असती तर महाविकास आघाडीसाठी हा विजय शक्य झाला असता.

राहुल कलाटे यांनी 2019 मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात चिंचवड विधानसभेत निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत राहुल कलाटे यांना जवळपास एक लाख बारा हजार मत मिळाली होती, त्यामुळे या निवडणुकीत राहुल कलाटे एक प्रबळ उमेदवार म्हणून पाहिले जातात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com