Raju Patil MNS Cm Eknath Shinde Saamtv
मुंबई/पुणे

Raju Patil News: साऱ्यांचाच पाऊस स्वागत करण्यासारखा नाही साहेब... MNS आमदार राजू पाटील यांचा CM शिंदेंना खोचक टोला

Raju Patil On Eknath Shinde: पाऊस आलाय, त्याचं स्वागत करा, बदनाम करायला अजून वेळ आहे ना..." असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, कल्याण...

Mumbai Rain News: कालपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुसळधार पावसाने मुंबईच्या (Mumbai Rain) नालेसफाईचे मात्र तीन तेरा वाजवले. सायन सर्कल, अंधेरी सबवे आणि दहिसर वेस्टन एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी तुंबल्याचं पाहायला मिळतं आहे.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर मनसे आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच साऱ्यांचाच पाऊस स्वागत करण्यासारखा नाही साहेब असे म्हणत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

पहिल्याच पावसात मुंबईत (Mumbai Rain) अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे पाहायला मिळाले. याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले असता मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी "पाऊस आलाय, त्याचं स्वागत करा, बदनाम करायला अजून वेळ आहे ना..." असे ते म्हणाले होते. तसेच "जिकडे नाले तुंबतील त्या ठिकाणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, जिकडे तुंबाणार नाही त्या अधिकाऱ्याचा सत्कार करण्यात येईल असं वक्तव्य केलं होतं. (Maharashtra Politics)

राजु पाटील यांचा ट्वीट करत केली टीका...

याच विधानावरुन मनसे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे. "साऱ्यांचाच पाऊस स्वागत करण्यासारखा नाहीए ना साहेब, गळक्या घरांनी, तुंबलेल्या नाल्यांनी, कंबरभर पाणी साचल्या रस्त्यांनी, टपापर्यंत बुडालेल्या गाड्यांनी, भिजल्या अन्नाच्या संसारांनी काय म्हणून पहायचं तुमच्या ह्या वक्तव्याकडे?" अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra News Live Update: बारामतीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; नागरिकांची धावपळ

OTT Weekend List: वीकेंडला पार्टनरसोबत घरी निवांत वेळ घालवायचा आहे का? मग पाहा या 7 रोमँटिक वेब सीरिज

TCS धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा! पीडित तरुणीला दाखवले व्हिडिओ, मौलाना कनेक्शन उघड

Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, OBC प्रमाणे ८ योजनांचा मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT