Ajit Pawar News: अजित पवारांनी पुन्हा बोलून दाखवली 'ती' इच्छा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ajit Pawar Latest News: सांगलीतील सभेनतंर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यांच्यासोबत मी प्रवासात गप्पा मारल्या.
Ajit Pawar Latest News
Ajit Pawar Latest Newssaam tv
Published On

>> अक्षय बडवे, साम टीव्ही

Maharashtra Politics: अजित पवार यांनी पुन्हा एकदा पक्षात पद मिळावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मी 32 वर्ष झाले राजकारणात आहेत. अनेक पदे भूषवली आहेत. मी जर सघटनेची काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर काय वाईट आहे. जे पद तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही द्या, असे म्हणत अजित पवार यांनी पुन्हा एकदा पक्षात पद देण्याबाबतची भूमिका मांडली आहे.

यापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलताना विरोधी पक्षनेतेपद नको, पक्षात एखादं पद द्या असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर दावा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आजित पवार यांनी त्यांची ही इच्छा माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे.

Ajit Pawar Latest News
Monsoon in Mumbai Coincidence: मान्सूनबाबत जुळून आला अनोखा योगायोग; तब्बल ६२ वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं

भुजबळ बरोबर बोलले आहेत - अजित पवार

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील पक्षाचं नेतृत्व ओबीसी समाजाला मिळावं अशी इच्छा व्यक्त केली होती. धनंजय मुंडे आणि जिंतेंद्र आव्हाड यांची नावे पुढे करताना भुजबळ यांनी स्वत: देखील प्रदेशाध्यक्षपद मिळावं अशी इच्छा व्यक्त केली होती.

त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले. मग वाईट काय झालं? मला जे वाटलं ते मी सांगितलं. शेवटी निर्णय पक्ष घेत असतो. वेगवेगळ्या घटकांना संधी का मिळू नये? भुजबळ बरोबर बोलले आहेत, पक्ष ठरवेल ते अंतिम असेल अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. (Marathi Tajya Batmya)

Ajit Pawar Latest News
Rain Dance Viral Video: पहिला पाऊस; दोघांच प्रेम अन् भर रस्त्यात रोमँटिक डान्स... व्हिडिओ पाहून नेटकरी प्रेमात!

अजित पवारांच्या सिद्धरामय्यांसोबत गप्पा

सांगलीतील सभेनतंर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यांच्यासोबत मी प्रवासात गप्पा मारल्या. त्यांच्या काही योजना आहेत त्यांनी जाणून घेतल्या. (Latest Political News)

ते सांगत होते, कर्नाटकात महिलांना बसेस फ्री असल्याने पुरुषांना जागा रहात नाही. मुला मुलींना शाळेत जायला जागा मिळत नाही. काही योजना निवडणुका जिंकण्यासाठी असतात, तर काही योजना जनतेच्या भाल्याच्या असतात. काही योजना घोषित करून मागे घ्याव्या लागतात. योजना देताना राज्याची आर्थिक क्षमता असली पाहिजे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com