MNS Raju Patil Tweet on Samruddhi Mahamarg Accident:  Saamtv
मुंबई/पुणे

MNS Raju Patil News: रक्तरंजित 'समृध्दी' किती बळी घेणार? 'मनसे'चा राज्य सरकारला संतप्त सवाल; शहापूर दुर्घटनेवरुन केले गंभीर आरोप

MLA Raju Patil Tweet On Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Gangappa Pujari

अभिजित देशमुख, प्रतिनिधी...

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील शहापूर सरलांबे इथे काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर पुलाचं काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळल्याने अपघात झाला. अपघातात आत्तापर्यंत १७ कामगारांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भिती आहे. अपघातानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

शहापूर तालुक्यातील (Shahapur) सरलंबे गावाजवळ समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना मोठी दुर्घटना घडली. क्रेन पडल्याने त्याखाली दबून तब्बल १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेनंतर मनसे (MNS) आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

काय म्हणाले राजू पाटील?

मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी ट्विट करत चूक कुणाची? भूक कुणाची ? रक्तरंजित 'समृध्दी' किती बळी घेणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. तसेच मृतांच्या कुटूंबियांना ५-५ लाख देऊन जबाबदारी झटकता येणार नाही. हे वारंवार का होतंय याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत पुरेशी काळजी न घेतल्याने दुर्घटना घडल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना ५-५ लाखांची मदत जाहीर केली आहे. या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही शोक व्यक्त करत याबाबत सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

SCROLL FOR NEXT