मुंबई : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसे पुन्हा नव्या जोमाने कामाला लागली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेने वरळीत मोठी फॅल्डिंग लावली आहे. वरळीत मनसेने जांबोरी मैदानावर एका कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमातून राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर भाष्य केलं. यावेळी राज ठाकरेंनी राज्यातील परप्रातीयांचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखीत केला. तुम्ही महाराष्ट्राचे मालक, मग कशाला रडताय? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा मांडला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्हिजन वरळी या कार्यक्रमाचे आयोजन केलंय. वरळीच्या जांबोरी मैदानावर हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळीत मनसेने एन्ट्री मारल्याने आदित्य ठाकरे विरूद्ध मनसे अशी लढाई होताना पाहायला मिळत आहे.
बीडीडी चाळ दिसल्यावर माझं बालपण आठवलं. मी लहानपणी बाळासाहेबांसोबत आणि माझ्या वडिलांसोबत यायचो.
आज मोठं भाषण करणार नाही. तुम्ही महाराष्ट्राचे मालक आहात, तुम्ही कसले रडताय ?
इतर राज्यातील लोक येतात, झोपडपट्टी बांधतात आणि नवीन घर मिळवतात. कारण तुम्ही योग्य वेळी काही करत नाही.
बाहेरच्या राज्यातील लोकांची टगेगिरी सुरू झाली की त्यांना हवं ते मिळतं.
2 कुटुंबाला एक पार्किंग हा अजब प्रकार येथे दिसला. तुम्हाला मुळात किंमतच नाही. तुम्हाला प्रकल्प येण्यापूर्वी विचारलं जात नाही. हे फक्त वरळीच नाही तर महाराष्ट्रात सुरू आहे.
आम्ही करू ते तुम्हाला मान्य, अशी आजवरच्या राज्यकर्त्यांची भावना आहे. ऐनवेळी चार तुकडे टाकून तुम्हाला शांत केलं जाणार आहे.
एका पुण्यात पाच पुणे झाले आहेत.डेव्हलमेंट प्लान होतो. टॉऊन प्लानिंग होत नाही. आम्ही स्क्वेअर फुटात अडकलोय. बिल्डर मलिदा घेऊन जातो.
तुम्ही एकत्र राहून सर्वांनी एकमुखाने बोलणं गरजेचं आहे. राष्ट्र उभारताना शंभर दोनशे वर्षांच्या विचार करावा लागतो.
सध्या शहरांना ओळख राहिलेली नाही, आजकाल फ्लायओव्हर आणि ब्रिजेस ही शहरांची ओळख बनली आहे. माझा विकासाला विरोध नाही पण हे कशासाठी चाललंय.
जगाच्या पाठीवर ठाण्यासारखा जिल्हा नाही. ठाणे या एका जिल्ह्यात 8 महापालिका आहेत. बाहेरच्या राज्यातील सर्वात जास्त लोक ठाणे जिल्हात येतात. वाढत्या शहरांसाठी सुविधा आणणार कुठून? इथला स्थानिक बेघर होताना बाहेरच्यांना कडेवर घेणार कसं?
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.