Raj Thackeray : मराठी भाषा दिवस 365 दिवस साजरा करु; मराठी भाषा दिनी राज ठाकरे कडाडले

Raj Thackeray Latest Speech : मराठी माणसाने मराठी भाषेसाठी काय केलं पाहिजे, याची शपथ लवकरच आणणार. मराठी भाषा दिवस 365 दिवस साजरा करु, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray
Raj ThackeraySaam tv

Raj Thackeray Latest News :

'आपण आपली भाषा का सोडतो. एवढी संस्कार झालेली आपली भाषा आहे. आपण कष्ट घेतलेली भाषा बाजूला सारली आहे, याचे वाईट वाटते. मराठी माणसाने मराठी भाषेसाठी काय केलं पाहिजे, याची शपथ लवकरच आणणार. मराठी भाषा दिवस 365 दिवस साजरा करु, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ते ठाण्यात बोलत होते. (Latest Marathi News)

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने ठाण्यात मराठी भाषा गौरव दिनाचं आयोजन केलं होतं. या आयोजित कार्यक्रमात राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केले.

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

१. सर्वांना मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आजच्या दिवशी यावं छान कार्यक्रम पाहावं आणि घरी जावं असं वाटत. पुढील दोन-तीन महिन्यात निवडणुका आहेत. त्यामुळे असे कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत.फक्त आमची पक-पक पाहायला मिळेल.

२. मराठी भाषा दिवस आपण एक दिवस का साजरा करतो. इतर कुठल्या राज्यात भाषा दिन साजरा होत असेल. पण साहित्य संमेलन सुद्धा होत नसतील. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Raj Thackeray
Narayan Rane Viral Post | नारायण राणे यांची ही चूक Sushma Andhare यांनी अचूक हेरली.. | Marathi News

३. राज्यात संत, साहित्यिक, महापुरुष होऊन गेले, कवी कवित्री होऊन गेले, पण महाराष्ट्राचे महत्त्व काय महाराष्ट्राची ताकद काय यावर गुढीपाडव्याच्या सभेत बोलेल.

४. मराठी भाषेत अनेक चित्रपट येत आहेत, त्यात काही कमतरता आहेत. नाटकात देखील त्या सुधारायची गरज सध्या आहे.

५. मराठी भाषा याविषयावर खूप काही बोलता येईल. पण आपण ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट बघतो, त्याला तामिळ आवाज आहे, पण आपल्या मराठी भाषेसाठी आपण हट्ट करायला हवा.

Raj Thackeray
Eknath Shinde News | दूध का दूध पाणी का पाणी होईल- मुख्यमंत्री | Marathi News

६. रविंद्रनाथ टागोर यांना मॅगसेसे पुरस्कार आहे, त्यांचे साहित्य बंगाली भाषेत आहेत. बंगाली भाषा त्यांनी सोडली नाही, त्यांनी त्यांची बंगाली भाषा जगाला दाखवली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com