(सुरज मसूरकर, लातूर)
नांदेडनंतर मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केला. पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. दरम्यान याचवेळी साखर संघ मुंबईच्या संचालक रश्मी बागल यांनीही भाजपात प्रवेश केलाय. (Latest News)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री असलेले बसवराज पाटील लिंगायत समाजाचे नेते आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात भाजप वाढू होऊ शकते. अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ बसवराज पाटील या ज्येष्ठ नेत्याने पक्षाला रामराम ठोकल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ज्या पक्षात होतो, तिथे ४० वर्षांचा प्रवास आहे. प्रत्येक निवडणुकीत (Election) सर्वांना सोबत घेऊन काम केले. त्याच निष्ठेने शुद्ध भावनेने काम करू असा शब्द देतो. माझी कुणाबाबतही तक्रार नसल्याचं बसवराज पाटील भाजप प्रवेशवेळी म्हणालेत. आज संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेतृत्वाखाली चांगले वातावरण निर्माण झाले आहे. देश एका वेगळ्या पद्धतीने सगळ्या विकासाच्या प्रश्नांकडे लक्ष देत विकसित होत आहे. देशासाठी आणि आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. देश त्याच्या पाठीमागे एक ताकद म्हणून उभी करणे आपली जबाबदारी असल्याचं प्रतिपादन बसवराज पाटील यांनी प्रवेशावेळी केलं.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात चांगला वातावरण आहे. राज्याला कसे पुढे घेऊन जाता येईल. यासाठी खंबीरपणे फडणवीस नेतृत्व करत आहेत. या नेतृत्वामागे आपण खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे, म्हणून मी प्रवेश करत असल्याचं बसवराज पाटील म्हणालेत. भाजपसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. ज्यांच्या प्रवेशासाठी आपण उपस्थित आहोत, ते मराठवाड्यातील एक ज्येष्ठ नेतृत्व बसवराज पाटील. तसेच करमाळ्यातील संघर्षशील रश्मी बागल, दिग्विजय बागल हे नेते. बसवराज पाटील यांसारखा जुना आणि जाणता नेता, ज्याने काँग्रेसला मराठवाड्यात बळ दिले ज्याने संघटन उभी केली.
४९ वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली. पाचवेळा आमदार आणि मंत्री तसेच विविध पदांवर काम केले. तरीही त्यांनी कधीही जमिन सोडली नाही. मी भाजपात त्यांचे स्वागत करतो. रश्मी ताई यांचे स्वागत करतो. सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी जमिनीवर काम करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा होती असं देवेंद्र फडणवीस पाटील यांच्या भाजप प्रवेशावेळी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.