Devendra Fadnavis: मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोण, बैठका कुणी घेतल्या? फडणवीस म्हणाले, सर्व माहिती माझ्याकडे

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोण, बैठका कुणी घेतल्या? हे आम्हाला सर्व माहित असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.
Devendra Fadnavis Vs Manoj Jarange
Devendra Fadnavis Vs Manoj Jarange Saam TV
Published On

Devendra Fadnavis Vs Manoj Jarange

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे मंगळवारी (ता. २७) विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. भाजप आमदारांनी जरांगे यांनी केलेल्या आंदोलनाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाच्या SIT चौकशीचे आदेश दिले. इतकंच जरांगेंचा बोलवता धनी कोण, बैठका कुणी घेतल्या? हे आम्हाला सर्व माहित असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Devendra Fadnavis Vs Manoj Jarange
Breaking News: PM मोदींना चॅलेंज करणारा जरांगे कोण? भाजप नेता विधानसभेत संतापला; नेमकं काय घडलं?

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाबाबत एक, एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. चौकशीतून सर्व समोर येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्च शांततेत झाले. परंतु बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले. त्यामागे कोण आहे, याचा शोध घेतला जाईल", असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. (Latest Marathi News)

"मनोज जरांगे यांचा बोलवता धनी कोण? बैठका कुणीकुणी घेतल्या. रात्री जाऊन त्यांना परत आणणारे कोण आहेत. हे आरोपी सांगत आहेत. पोलिसांवर दगडफेक करा हे आरोपींनी कबूल केलं आहे. ज्या पोलिसांववर दगडफेक झाली ते पोलीस आपले नाही का?" असा सवालही फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उपस्थित केला.

"बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले. त्यामागे कोण आहे. जरांगे यांचे कोणासोबत फोटो निघत आहे. कोणाच्या पैसा त्याच्यामागे आहे. यासंदर्भात एक एक गोष्टी बाहेर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात आणि तुम्ही कोणाची आयामाय काढणार असेल तर कसे चालणार," असं म्हणत फडणवीसांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली.

“मी मराठा समाजासाठी काय काय केलंय हे संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठा समाजाला माहिती आहे. मुख्यमंत्री असताना मी मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते उच्च न्यायालयातही टिकवलं. सारथीसारखी संस्था सुरू करणं, विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देणं अशा योजना आपण सरकारच्या वतीने सुरू केल्या. त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कुणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही”, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis Vs Manoj Jarange
Manoj Jarange News: मनोज जरांगेंना तत्काळ अटक करा, भाजपच्या बड्या नेत्याची मागणी; विधानपरिषदेत काय घडतंय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com