Breaking News: PM मोदींना चॅलेंज करणारा जरांगे कोण? भाजप नेता विधानसभेत संतापला; नेमकं काय घडलं?

Manoj Jarange Patil News: महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा जरांगे यांनी केली, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असं म्हणत आशिष शेलार यांनी जरांगेंची थेट एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली.
Manoj Jarange Patil Vs BJP
Manoj Jarange Patil Vs BJP Saam TV

Manoj Jarange Patil Vs BJP Maharashtra Politics

गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी करत शांततेत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी अचानक आक्रमक पवित्रा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत जरांगेनी थेट मुंबईतील सागर बंगल्यावर धडकण्याचा इशारा दिला. जरांगेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मराठा समाजही आक्रमक झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil Vs BJP
Maharashtra Politics: लोकसभेसाठी शिंदे गटाचं ठरलं, ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार; भाजपचं टेन्शन वाढणार?

सोमवारी (२६ फेब्रुवारी) मराठा समाजाने राज्यभरात तीव्र निर्देशने केली. यावेळी जाळपोळीच्या घटना देखील घडल्या. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनातही उमटले आहेत.

भाजप नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा जरांगे यांनी केली, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असं म्हणत आशिष शेलार यांनी जरांगेंची थेट एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली.

ओबीसी समाजासाठी भूमिका मांडण्याऱ्या छगन भुजबळ यांना देखील धमक्या देण्यात आल्या, याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं. जरांगे यांच्या भूमिकेमुळे मराठा समाजाची देखील बदनामी होत असल्याचं शेलार म्हणाले.

मराठा समाजाने आरक्षणासाठी शांततेत ५७ मोर्चे काढले. त्यावेळी लाखो मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. त्यालाही गालबोट लावण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप शेलार यांनी केला. आम्ही मराठा आंदोलक आणि जरांगे पाटील यांचा आदर करतो, पण त्यांची भाषा ठीक असावी, असं देखील शेलार यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींची एकही सभा होऊ देणार नाही, असा इसाशा दिला होता. यावर देखील आशिष शेलार यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज करणारा जरांगे कोण? असा सवालच शेलार यांनी सभागृहात उपस्थित केला.

Manoj Jarange Patil Vs BJP
Breaking News: अजित पवारांच्या कट्टर समर्थकाचा तडकाफडकी राजीनामा; राष्ट्रवादीत मोठी खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com