शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Sensex Tanks Over 1,200 Points: शेअर मार्केटमध्ये गुरुवारी मोठी घसरण झाली. ग्रीन झोन उघडताच सेंसेक्स निफ्टी मार्केट बंद होता होता कोसळले आणि गुंतवणूकदारांचे 7 लाख करोड स्वाहा झाले.
Traders react as Sensex plunges over 1,200 points during the final hour sell-off on Dalal Street
Traders react as Sensex plunges over 1,200 points during the final hour sell-off on Dalal StreetSaam Tv
Published On

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठीचा आजचा दिवस खूपच खराब राहिला. सुरुवातीला शेअर मार्केट हे जोरदार सुरू होते. मात्र अचानक मार्केटने आपली दिशा बदलली. व्यवहाराच्या शेवटच्या तासात असा गोंधळ उडाला की बाजार काही क्षणातच कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स १,२०० पेक्षा जास्त अंकांनी घसरून बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ३६५ अंकांनी घसरून बंद झाला. या बाजारातील गोंधळामुळे गुंतवणूकदारांना ७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले.

Traders react as Sensex plunges over 1,200 points during the final hour sell-off on Dalal Street
IIM Mumbai Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IIM मुंबईत नोकरी; विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

या आठवड्याच्या चौथ्या दिवशी सुरुवातीला शेअर मार्केटला दिलासा मिळाला आणि दोन्ही निर्देशांक ग्रीन झोनमध्ये उघडले. काही काळ वाढ झाल्यानंतर, सेंसेक्स निफ्टी घसरू लागला आणि शेवटपर्यंत घसरत राहिला. 83,969 वर उघडल्यानंतर बीएसई सेंसेक्स 1236,11 अंकांनी घसरून 82,498 वर बंद झाला, तर मागच्या आठवड्यात व्यवहारच्या दिवशी तो 83,734.25 वर बंद झाला होता. एनएसई निफ्टीबद्दल सांगायचे झाले तर, 50 शेअर्सचा निर्देशांक 25,873 वर उघडला आणि 365 अंकांनी घसरून 25,454 वर बंद झाला. मागच्या आठवड्यातील बुधवारी तो 25, 819 वर बंद झाला होता.

Traders react as Sensex plunges over 1,200 points during the final hour sell-off on Dalal Street
Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

रिलायन्स-अदानीचे शेअर्स विखुरले

बाजारात झालेल्या या मोठ्या घसरणीत, मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजपासून ते गौतम अदानींच्या अदानी पोर्टपर्यंत सर्व मोठ्या कंपन्यांचे शेअर्स पत्त्यांच्या गठ्ठ्यासारखे विखुरलेले दिसून आले. सर्वात जास्त घसरलेल्या टॉप-१० शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर, लार्जकॅप श्रेणीमध्ये, इंडिगो शेअर (३.२३%), एम अँड एम शेअर (२.९७%), ट्रेंट शेअर (२.८९%), बीईएल शेअर (२.७०%), अदानी पोर्ट्स शेअर (२.५०%), कोटक बँक शेअर (२.२९%) आणि रिलायन्स शेअर (२.११%) घसरणीसह बंद झाले. मिडकॅप श्रेणीमध्येही घबराट पसरली आणि हिंदुस्तान पेट्रोलियम शेअर (४.९५%), पेटीएम शेअर (४.५१%) आणि गोदरेज प्रॉपर्टीज शेअर (३.५०%) घसरणीसह बंद झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com