mla vishwanath bhoir unhappy on drainage cleanliness drive in kalyan  Saam Digital
मुंबई/पुणे

कल्याणमधील नालेसफाईवर आमदार भाेईर नाराज, KDMC अधिका-यांना 5 दिवसांचा अल्टीमेटम

drainage cleanliness drive in kalyan : ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणारी आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणारी नालेसफाई आपल्याला मान्य नाही असे आमदार विश्वनाथ भाेईर यांनी अधिका-यांना खडसावताना नमूद केले.

Siddharth Latkar

- अभिजीत देशमुख

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना कल्याण डोंबिवलीतील नाल्यातील गाळ तसाच असल्याचे दिसून येतेय. आज (शुक्रवार) आमदार विश्वनाथ भोईर यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत नालेसफाईच्या कामांची पाहणी केल्यानंतर कामाबाबत नाराजी व्यक्त केली. आमदार भाेईर यांनी नालेसफाईसाठी पाच दिवसांचा अल्टीमेटम देत काम याेग्य न झाल्यास केडीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांची गय केली जाणार नाही असा इशारा दिला.

आमदार विश्वनाथ भोईर यांना आज नाल्यांमध्ये कचरा, साचलेला कचरा आढळून आल्याने ते संतप्त झाले. आमदार भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नालेसफाईसाठी केडीएमसीकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र हा सर्व पैसा जनतेच्या खिशातून आलेला असून त्याची उधळपट्टी आपण होऊ देणार नाही अशा शब्दांत आमदार भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना सुनावले.

तसेच यावेळी केडीएमसी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी नालेसफाई केली असल्याचे आमदार भोईर यांना सांगितले. मात्र नालेसफाई झाली असे तुम्ही सांगता मग नाल्यात हा कचरा आणि गाळ कसा काय आहे? असा सवाल भाेईर यांनी केला.

लोकांना आम्हाला उत्तरे द्यावी लागतात असे सांगत पुढील 5 दिवसांत कल्याण पश्चिमेतील सर्व प्रमुख नाल्यांची सफाई योग्य तऱ्हेने झाली पाहिजे. आपण पाच दिवसांनी पुन्हा पाहणी करू आणि आपल्याला कुठे नाले सफाई झाली नसल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराची आपण कोणतीही गय करणार नाही असा सज्जड दम आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना दिला.

Byte :- विश्वनाथ भोईर ( आमदार कल्याण पश्चिम)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT