KDMC News : केडीएमसी भ्रष्टाचाराचे कुरण बनले : आमदार विश्वनाथ भोईर

केडीएमसीची किती बदनामी आपण करणार आहाेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ही सामूहिक जबाबदारी असून सर्वांनी पार पाडली पाहिजे असे आमदार भोईर यांनी नमूद केले.
Mla Vishwanath Bhoir
Mla Vishwanath Bhoirsaam tv
Published On

- अभिजीत देशमुख

Kalyan News :

केडीएमसी भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. शासकीय अधिकारी चरण्यासाठी येतात असा आराेप करीत आयुक्तांनी अशा अधिकाऱ्यांवर आळा घालावा त्यांच्यावर बंधने घालावीत असे मत आमदार विश्वनाथ भोईर (Mla Vishwanath Bhoir) यांनी व्यक्त केली. दरम्यान ही सामूहिक जबाबदारी असून सर्वांनी पार पाडावी अशी अपेक्षा आमदार भोईर यांनी व्यक्त केली. (Maharashtra News)

इमारतीच्या बांधकाम मंजुरीसाठी बनावट नकाशे व कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी गुरुवारी कल्याणच्या बाजारपेठ पोलीसांनी केडीएमसी नगररचना विभागातील दोन अधिका-यांना बेड्या ठोकल्यात. ही घटना उजेडात आल्यानंतर पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Mla Vishwanath Bhoir
Pune Metro : पुणे मेट्रोतून प्रवास करणा-यांसाठी महत्वाची बातमी, शुक्रवारपासून 'ही' सुविधा हाेणार बंद, नेटीझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया

या घटनेनंतर कल्याण पश्चिम ते शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया नाेंदविली आहे. आमदार भाेईर म्हणाले कल्याण डोंबिवली महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनत चालली आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता नसल्याने प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे कोणाचा कोणावर वचक राहिला नाही असेही भाेईर यांनी म्हटले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावे

आमदार भाेईर म्हणाले बाहेरून आलेले शासनाचे अधिकारी त्यांच्या हाताखाली राहणारे कर्मचारी कुरण असल्यासारखे चरत असतात, अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना लोकांशी काही देणंघेणे नाही. महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड चांगल्या आहेत आयएएस ऑफिसर आहेत. त्या चांगलं काम करताहेत. त्यांनी गैरप्रकार काम करणा-या अधिकारी कर्मचाऱ्यांवर आळा घालावा, बंधनं घालावीत.

हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. केडीएमसीची किती बदनामी आपण करणार हे कुठेतरी थांबलं पाहिजे ,ही सामूहिक जबाबदारी ती सर्वांनी पार पाडली पाहिजे असेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Mla Vishwanath Bhoir
Kalyan Malang Gad Yatra : वारकरी महोत्सवातील 'त्या' विधानानंतर एकनाथ शिंदे मलंगगडावर येणार, यात्रेत मुख्यमंत्री काेणती घोषणा करणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com