Bachchu Kadu News Saam Tv
मुंबई/पुणे

Bachchu Kadu News: बच्चू कडू यांना मोठा दिलासा; मुंबई हायकोर्टाकडून 1 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती, काय आहे प्रकरण?

Bachchu Kadu News: नाशिकमधील याच प्रकरणात कोर्टाने दिलासा देत मारहाणीच्या गुन्ह्यात झालेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड

Bachchu Kadu News: प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. नाशिकमध्ये सरकारी कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने ५ हजारांचा दंड आणि एक वर्षाची शिक्षा ठोठावली होती. नाशिकमधील याच प्रकरणात कोर्टाने दिलासा देत १ वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. (Latest Marathi News)

2017 साली दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी महापालिकेत आंदोलन केलं होते. यावेळी बच्चू कडू (Bachchu Kadu) तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले होते. तसेच शिवीगाळ केली होती. या प्रकरणी बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

नाशिकच्या याच प्रकरणात बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बच्चू कडू यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच नाशिकमध्ये दाखल गुन्ह्यातील शिक्षेला स्थगिती देखील मिळाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

2017 साली नाशिक महापालिकेवर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी बच्चू कडू यांचा संयम सुटला.

त्यानंतर कडू हे थेट आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी आयुक्तांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारल्याचा दावा केला जातो. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांना संरक्षण देत आमदार बच्चू कडू यांना बाजूला केले होते.

तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बच्चू कडू यांना दोन वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT