Maharashtra Unseasonal Rain: अवकाळीने शेतकरी बेजार, मदत कधी मिळणार? कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले...

अवकाळीने शेतकरी बेजार, मदत कधी मिळणार? कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले...
Abdul Sattar On Maharashtra Unseasonal Rain
Abdul Sattar On Maharashtra Unseasonal RainSaam TV

Abdul Sattar On Maharashtra Unseasonal Rain : अवकाळी व गारपिटीचा पावसाचा तडका प्रत्येक जिल्ह्याला बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे त्यांचे नामे सतत सुरू आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त आहेत. एक वेळेस पाऊस संपल्यानंतर आणि पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत कॅबिनेटमध्ये पंचनाम्यानवर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तारे यांनी आज दिली.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृहांचे उद्घाटन करण्यासाठी ते आज अकोल्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पंचनामे सुरू आहेत. अंतिम पंचनामे आले आणि वस्तुनिष्ठ पंचनामे आले की कोणत्या पिकाला कोणते अनुदान द्यायचे हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निकषानुसार ठरविण्यात आल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  (Latest Marathi News)

Abdul Sattar On Maharashtra Unseasonal Rain
Maharashtra Unseasonal Rain Update: अवकाळीचा फटका! बीडमध्ये पुरामुळे 10 गावांचा संपर्क तुटला, राज्यात मोठं नुकसान

त्यासोबतच एक जेव्हा हवामान खात्याने आपणास सांगितले की, आता पाऊस पडणार नाही. त्यानंतरच या पंचनामांचे सत्र थांबणार आहे. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यस्तरावर तातडीने प्रयत्न करणार असल्याचेही कृषिमंत्री सत्ता म्हणाले.

माझ्या 42 वर्षांच्या राजकीय काळात एवढा मोठा पाऊस पहिल्यांदाच पडत आहे. शेतकरी अस्मानी संकट आणि त्रस्त आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना हवी ती मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शासन पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याचेही सत्तार यावेळी म्हणाले.

Abdul Sattar On Maharashtra Unseasonal Rain
Post Office Investment Schemes : पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनते दररोज 333 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर 16 लाख रुपये मिळवा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मंत्री उदय सावंत आमचे नेते आहेत. त्यांनी जी माहिती तुम्हाला दिली असेल तुम्ही त्याबद्दल त्यांच्याशी बोला. परंतु ते जे म्हणाले त्याबद्दल सत्यच असेल. ठाकरे गटाचे अनेक नेते त्यांच्या संपर्कात आहेत, ते असतीलही. परंतु या संदर्भात तेच तुम्हाला सांगू शकतील. मात्र ठाकरे साहेब हे त्यांच्या शैलीमध्ये मंत्री उदय सामंत यांचा समाचार घेतील, अशी मिश्किल टिका कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com