Post Office Investment Schemes : पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनते दररोज 333 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर 16 लाख रुपये मिळवा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनते दररोज 333 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर 16 लाख रुपये मिळवा
Post Office Investment Schemes
Post Office Investment SchemesSaam Tv

Post Office Investment Schemes : देशातील मध्यमवर्गीय व्यक्ती आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी विविध ठिकाणी गुंतवणूक करतो. विविध बँक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा जास्त ऑफर्स देतात. पोस्ट ऑफिसही यामध्ये मागे नाही. आजच्या काळात पोस्ट ऑफिस हे भारतातील प्रत्येकासाठी एक विश्वासार्ह पर्याय बनले आहे.

मोठ्या संख्येने लोक त्यांच्या कष्टाचे पैसे येथे गुंतवून चांगला परतावा मिळवतात. पोस्ट ऑफिसने आता एक नवीन योजना (Scheme) आणली आहे. ज्या अंतर्गत दररोज 333 रुपये जमा करून 16 लाख रुपये मिळू शकतात. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत...

Post Office Investment Schemes
MSSC Scheme: पोस्टाची 'ही' योजना बेस्ट नाही तर जबरदस्त आहे, स्मृती इराणींनीही रांगेत उभं राहून उघडलं खातं

10 वर्षांनी मिळणार गुंतवणुकीवर चार लाख रुपये

जे लोक आपले पैसे वाढवण्यासाठी बँकांमध्ये नियमितपणे लहान रक्कम गुंतवतात, ते पोस्ट ऑफिसच्या या नवीन आरडी योजनेचा विचार करू शकतात. यामध्ये कमी गुंतवणुकीत मोठा फायदा होईल. सध्या पोस्ट ऑफिस आरडी पॉलिसीवर ग्राहकांना 5.8% व्याजदर देत आहे. अशा परिस्थितीत दरमहा 10,000 रुपये किंवा दररोज सुमारे 333 रुपये गुंतवल्यास सुमारे 16 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो. (Latest Marathi News)

Post Office Investment Schemes
Retirement Plans : रिटायरमेंट नंतरचे आनंदी आयुष्य कसे जगाल? गुंतवणुकीसाठी सोपे पर्याय

ही संपूर्ण 10 वर्षांची योजना आहे. याचा अर्थ ग्राहकांना 10 वर्षे दरमहा 10 हजार जमा करावे लागतील. दहा वर्षांनी ही रक्कम 12 लाख होईल. यावर पोस्ट ऑफिस 4.26 लाख रुपये व्याज देईल. त्याचप्रमाणे पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर ग्राहकांना एकूण 16.26 लाख रुपये मिळतील. तसेच या योजनेअंतर्गत खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर आवश्यक असल्यास, तुम्ही 50-60 टक्के रक्कम काढू शकता.

बचत वाढवण्यासाठी एक स्मार्ट पर्याय

या पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये पैसे गुंतवून केल्यास तुमचे पैसे बुडण्याचा धोका नाही. कालांतराने त्यांची बचत वाढवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक स्मार्ट निवड आहे. या बचत योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा 18 वर्षे किंवा त्याहून अधिक ठेवण्यात आली आहे.

त्याचबरोबर अल्पवयीन मुलांचे पालकही या योजनेसाठी पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकतात. नंतर हा पैसा मुलांच्या शिक्षणावर किंवा इतर कामांवर खर्च करता येईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही. कोणतीही योजना घेण्यापूर्वी त्याचा पूर्ण अभ्यास करावा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com