Mahila Samman Saving Certificate: महिला आणि मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक योजना सुरू करत असते. 2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी एका योजनेबद्दल सांगितले होते. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate) असे या योजनेचे नाव आहे.
अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर ही योजना १ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. योजना सुरू झाल्यानंतर आता केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी संसद मार्गावरील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन 'महिला सन्मान बचत प्रमाणपत्र' योजनेअंतर्गत खाते उघडले आहे. (Latest Marathi News)
रांगेत उभं राहून उघडलं खातं
स्मृती इराणी यांनी पोस्ट ऑफिसमध्ये रांगेत उभे राहून हे खाते उघडले. त्या 26 एप्रिल रोजी सामान्य नागरिकांप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचल्या आणि रांगेत उभी राहून त्यांनी खाते उघडण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांना संगणकाद्वारे तयार केलेले पासबुक देण्यात आले.
हे खाते उघडल्यानंतर त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठी पावले उचलली जात आहेत. महिला सक्षमीकरणासाठी हे पाऊल एक अनोखे उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच महिला व मुलींनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
दोन वर्षांच्या कालावधीची ही योजना दर तिमाहीला 7.5 टक्के चक्रवाढ आकर्षक व्याजदर देणार
यामध्ये दोन लाख रुपयांच्या कमाल मर्यादेसह लवचिक गुंतवणूक आणि आंशिक पैसे काढण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध आहे.
ही योजना देशातील सर्व 1.59 टपाल कार्यालयांमध्ये 1 एप्रिल 2023 पासून उपलब्ध करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 03 एप्रिल 2023 रोजी आपल्या ट्वीटर संदेशामधून या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.