Jayant Patil on Eknath Shinde : 'एकनाथ शिंदे आमच्या संपर्कात', सामंतांच्या दाव्यानंतर जयंत पाटील यांचं मोठं वक्तव्य

'एकनाथ शिंदे आमच्या संपर्कात', सामंतांच्या दाव्यानंतर जयंत पाटील यांचं मोठं वक्तव्य
Jayanat Patil on Eknath Shinde
Jayanat Patil on Eknath ShindeSaam Tv
Published On

Jayant Patil on Eknath Shinde : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे सेनेतील उरलेले 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीचे 20 आमदार व काँग्रेसचे बडे नेते देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. यावर आता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले आहेत की, ''संपर्कात सगळेच एकमेकांशी असतात. तसे एकनाथ शिंदे हे माझ्या संपर्कात आहेत. त्यामुळेच उदय सामंत म्हणतात, ते काही खोटे नाही.''

Jayanat Patil on Eknath Shinde
Uday samant On Thackeray Group : ठाकरे गटाचे १३ आमदार शिवसेनेच्या संपर्कात? उदय सामंत यांचा मोठा दावा

जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज असून ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील, असं राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणले होते. यावर आता जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ''माझ्या सत्काराच्या भाषणात त्यांनी त्याचे मत व्यक्त केले. त्यात कोणाशी स्पर्धा करण्यात मत नाही. राज्यात पोस्टर लागली पण महाराष्ट्रामध्ये उत्साही कार्यकर्ते आहेत.'' (Latest Political News)

शरद पवार म्हणाले होते की, आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. यावर पाटील म्हणाले, ''आमच्या पक्षात शरद पवार जे ठरवतात, तेच धोरण असतं. त्यामुळे पवार यांना जे योग्य वाटतं, तेच आमच्या पक्षात होत असतं. आमच्या पक्षात पवार हे सर्व स्तरावरचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे ते म्हणतील त्याप्रमाणे होईल.''  (Maharashtra Politics)

Jayanat Patil on Eknath Shinde
Sudan- Sangli : सुदान गृहयुद्धात अडकले शंभर सांगलीकर, बचावासाठी जयंत पाटलांचं परराष्ट्र मंत्रालयाला ट्वीट

कर्नाटकात मधील भाषणामध्ये अमित शहा यांनी सांगितले की, सत्ता त्यांच्या विरोधात जर गेली तर त्या ठिकाणी दंगल घडवण्याची शक्यता आहे. यावर पाटील म्हणाले, ''त्यांनी विधान केलं ते कर्नाटकाचा संदर्भ देऊन केलं. महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार ज्यावेळी अडीच वर्ष होतं. त्यावेळी सर्व समाज सर्व जाती धर्मातील लोक गुन्हे गोविंदाने राहत होते. ज्या ठिकाणी दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला, तो त्याच ठिकाणी जागेवरच ठेचण्याचं काम देखील पोलिसांनी त्यावेळी अतिशय साक्षपणे केलं. मी परवाच कर्नाटकला प्रचारासाठी नारळ फोडण्यासाठी गेलेलो होतो. त्यावेळी त्या ठिकाणचं वातावरण बघितलं भाजप विरोधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com