Sudan- Sangli : सुदान गृहयुद्धात अडकले शंभर सांगलीकर, बचावासाठी जयंत पाटलांचं परराष्ट्र मंत्रालयाला ट्वीट

Sangli : सुदान गृहयुद्धात अडकले शंभर सांगलीकर, बचावासाठी जयंत पाटलांचं परराष्ट्र मंत्रालयाला ट्वीट
Jayant Patil On Sudan War
Jayant Patil On Sudan WarSaam TV
Published On

Jayant Patil On Sudan War : सुदानची राजधानी खार्तुममध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता पसरली आहे. सुदान सैन्य आणि बंडखोर निमलष्करी दल यांमधील संघर्ष वाढताना दिसत आहे. या हिंसाचारात सामान्या नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थिती अनेक भारतीय नागरिक हे सुदानमध्ये अडकेल आहे. ज्यात शंभर सांगलीकरांचाही समावेश आहे.

यातच सुदानमध्ये अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरीकांच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे सरसावले आहेत. या नागरिकांना परत आणण्यासाठी लक्ष देऊन योग्य पावले उचलण्याची मागणी त्यांनी परराष्ट्र मंत्र्यांकडे ट्वीटद्वारे केली आहे. (Latest Marathi News)

Jayant Patil On Sudan War
Uddhav Thackeray Latest Speech : आताचं सरकार हे काम'गार' करणारं सरकार, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

सुदानमध्ये सुरु असलेल्या देशातंर्गत यादवी युद्धामुळे सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरीक अडकले आहेत. भारतीय दूतावासाने अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणापासून सुमारे १२०० किलोमीटरवर हे नागरीक आहेत.

Jayant Patil On Sudan War
Nitesh Rane on Uddhav Thackeray: ...तर उद्धव ठाकरे यांचे कपडे फाडल्याशिवाय मी राहणार नाही: नितेश राणे

परराष्ट्र खात्याकडून ऑपरेशन कावेरी अंतर्गत भारतीय नागरिकांना मायदेशी आणले जात आहे. आतापर्यंत काही भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com